शहिददिना निमित्य परमडोह येथे २७ मार्चला निराधार शिबिर


वणी :- तालुक्यातील परमडोह येथे २३ मार्च शहीददिना निमित्य २७ मार्च रोजी दुपारी १२ वाजता सार्वजनिक सभागृहात निराधार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन वंचित बहुजन आघाडी व श्रीगुरुदेव सेनेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
देशाच्या स्वातंत्र लढ्यातील वीर क्रांतिकारी भगतसिंह , सुखदेव , राजगुरू या देशभक्तांना इंग्रजी राजवटीने ता. २३ मार्च १९३१ रोजी फाशी दिली होती तेव्हा पासून हा दिवस म्हणजे शहीद दिवस म्हणून ओळखल्या जातो. या शहिदांना अभिवादन म्हणून गोरगरीब निराधारांच्या सेवेसाठी परमडोह येथे श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांनी सुरू केलेल्या एक दिवस निराधारांसाठी या उपक्रमांतर्गत निराधार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला वंचितचे जिल्हाउपाध्यक्ष मंगल तेलंग परमडोह ग्राम पंचायतचे सरपंच मधुकर वाभिटकर उपसरपंच सोमेश्वर टेकाम सामाजिक कार्यकर्ते संदीप थेरे, सुभाष परचाके, प्रतिमा मडावी यांचे उपस्थितीत हे शिबिर संपन्न होणार असून शासनाच्या नियमात बसतील अश्या गोरगरीब वयोवृद्ध, विधवा माता बघिनी, व दिव्यांगांचे निराधार अनुदान वेतनासाठी अर्ज भरून घेतल्या जाणार आहे.

एक दिवस निराधारांसाठी या उपक्रमाची सांगता

श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांनी सुरु केलेला एक दिवस निराधारांसाठी हा स्तुत्य उपक्रम ता. २० डिसेंम्बर२०२२ म्हणजे कर्मसंत गाडगे महाराज स्मृती दिनापासून ते शहीद दिन ता. २३ मार्च २०२२ पर्यंत तब्बल ४ महिने गावागावात जाऊन जवळपास ४०० च्या वर वंचित असलेल्या निराधांची निवड करून त्यांच्या निराधारांना मान्यता मिळवून देण्यात आली. हा उपक्रमची परमडोह येथे सायंकाळी ७ वा शहिदांना अभिवादन करून सांगता करण्यात येत असून समोरील महिन्यात एका नवीन अभियानाची सुरवात होत असल्याची माहिती तालुका प्रसिद्धी प्रमुख रमेश तांबे यांनी दिली आहे.