बाभूळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज शंकर पटाचे आयोजन.

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

येथील बस स्थानकावरील कोपरा रोड लगत अभय गुगलिया यांच्या शेतामध्ये दि. 23 मार्च पासून श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज जंगी शंकर पटाचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी मंचकावर माजी शिक्षण मंत्री प्रा. वसंतरावजी पुरके, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. संध्याताई दिलीपराव सव्वालाखे, ज्येष्ठ नेते भैय्यासाहेब देशमुख, कृष्णा कडू, जि. प. चे माजी अध्यक्ष अशोकराव घारफळकर, बँकेचे माजी संचालक प्राध्यापक भिमसिंग बाबू सोळंके, तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ. प्रितीताई वानखडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र कोंबे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष श्रीकांत कापसे, नगरपंचायत चे उपाध्यक्ष शाम जगताप, अतुल देशमुख, अभय गुगलिया, जयवंत घोंगे, कृष्णा ढाले, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन बनकर, वासुदेव शिंदे गजानन नाईकवाड, बळवंतराव जगताप, विष्णू ढाकुलकर, अमोल कापसे, गणीभाई, संतोष राठी आदी मान्यवर मंचकावर विराजमान होते.
काही अटी घालून सर्वोच्च न्यायालयाने गेल्या सात वर्षाच्या लढ्यानंतर पटाची परवानगी दिली ही चांगली बाब झाली यात लोकशाही आघाडी सरकारचेही मोठे योगदान आहे असे मत माजी शिक्षण मंत्री प्राध्यापक वसंतरावजी पुरके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. मान्यवरांचीही यावेळी समयोचित भाषणे झाली.
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून शंकर पटाची सुरुवात झाली.
यावेळी शेतकरी संघटनेचे धडाडीचे कार्यकर्ते नाना खांदवे, अविनाश वानखडे, अंकुश सोयाम, प्रकाश गावंडे, आशिष सोळंके, गोलू राठी, दीपक बरडे हजर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक मनमोहन भोयर यांनी केले.
शंकर पटाचे आयोजन मोहन भोयर यांनी केले होते. त्यांना शेखर अर्जुने, संजय गावंडे, सिद्धेश्वर चौधरी, जनार्धन मंडाळे, सुनील येडे, युवराज दहाट, राजू पांडे, महेंद्र घुरडे, राजू चुके, अमय घोडे, प्रविण वाईकर, सतीश मेंढे, वीरेंद्र महानूर, अजय तातड, अशिष गुप्ता, अविनाश गावंडे, जितेंद्र राऊत, सागर गावंडे, उमाकांत राठोड आदींचे सहकार्य लाभले.