
सद्या उन्हाळा तापायला सुरुवात झाली आहे.अशावेळी नागरिकांना पिण्याचे पाणी शहरात कुठेही उपलब्ध नसल्यामुळे या वर्षी रामनवमी उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ पाणपोई सुरू करण्यात आली.या पाणपोईचे आज ६ एप्रिल रोजी उद्घाटन उत्सव समितीचे अध्यक्ष विजय चोरडिया यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी राजाभाऊ बिलोरीया, सचिव श्याम बडगरे, उमेश पोद्दार, अजिंक्य शेंडे,व महिला उपस्थित होत्या.
