चोरीच्या दुचाकी वाहन विक्री करताना चोरट्याला अटक

वणी:— नितेश ताजणे


चंद्रपूर जिल्ह्यातील चोरट्यांनी मोटरसायकल चोरुन वणी शहरात विक्री साठी आणुन फिरत असल्याची गुप्त माहिती ठाणेदार प्रदिप शिरस्कर यांना मिळाली असता त्यांनी वणी येथील डि.बी. पथकाला पाठविले असता दोन इसम दिपक टॉकीज परीसरात बजाज प्लॉटीना मोटरसायकल क्रमांक एम.एच.३४ बि.डी.३२४८ हि चोरीची मोटरसायकल घेऊन फिरत असताना त्यांना थांबविले असता ते दोघेही मोटरसायकल घेऊन जाऊ लागले त्यांना विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली ती मोटरसायकल चोरीची असल्याचा संशय आल्याने त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी ती मोटरसायकल वरोरा येथुन चोरून आणल्याचे सांगितले आणि आणखी मोटरसायकल विक्री करीता आणल्या असुन त्या प्रेमनगर परीसरात काटेरी झाडा झुडपात लपवून ठेवल्या असल्याचे सांगितले लपवून ठेवलेल्या मोटरसायकल त्यांनी दाखवून दिल्या आरोपी मोहम्मद अब्दुल कादीर थैम वय २६ मोटर मॉकनिक हनुमान वार्ड मेन रोड वरोरा, रंजीत रंगराव किनाके वय २५ कॉलरी वार्ड वरोरा जिल्हा चंद्रपूर यांना ताब्यात घेऊन चोरीचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. त्यांचेकडून चोरीच्या पाच मोटरसायकल, दोन मोबाईल एकुण किंमत १,९५,००० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार, ठाणेदार प्रदिप शिरस्कार वणी यांचे मार्गदर्शनाखाली डि.बी.पथक प्रमुख सपोनी माधव शिंदे,सफौ सुदर्शन वानोळे, सुहास मंदावार, विठ्ठल बुरुजवाडे,हरीन्दकुमार भारती, संतोष आढाव, पुरुषोत्तम डडमल यांनी केली
.