
उच्च प्राथमिक शाळा रेणकापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वीजयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला शाळा समिती अध्यक्ष सौ स्वाती शेंडे, उपाध्यक्ष सुनील सहारे, सदस्य ईश्वर सिडाम व इतर सदस्य शिक्षक व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मु अ. श्री येनुरकर सर यांनी केले. अध्यक्ष, उपाध्यक्ष व शिक्षक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी कार्यक्रमाची सांगता प्रसाद वाटून करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन श्री फुलमाळी यांनी तर आभार प्रदर्शन श्री पिपरधारे सर यांनी केले.
या कार्यक्रमानंतर संगीत खुर्ची, निबंध लेखन तसेच इतर उपक्रम घेण्यात आले.
