
पोंभूर्णा :- उमरी पोतदार येथून आंबई तुकूम गावाकडे जात असताना आंबेधानोरा- उमरी पोतदार मार्गांवरील छोट्या पुलाजवळ दुचाकीवरचा ताबा सुटला व पुलीयाच्या लोखंडी सुरक्षा कठड्याला आदळल्याने दोघांचा अपघाती मृत्यू झाला. सदर घटना दि.१४ एप्रिल ला संध्याकाळी ५:३० वाजता घडली. मृतांमध्ये उमरी पोतदार येथील बंडू गोपाळा येळमे वय ४२ वर्ष व टेंभूरवाही ता.राजुरा येथील कैलास देवाजी कोडापे वय ३५ वर्ष यांचा समावेश आहे.
पुढील तपास उमरी पोतदारचे ठाणेदार किशोर शेरकी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
