वणी येथे गंगा बार परिसरात आढळून आला अज्ञात ईसमाचा मृतदेह

तालुका प्रतिनिधी:- शेखर पिंपळशेंडे

आज दिनांक (१६ एप्रिल) शनिवारला रोजी दुपारी ५ वाजेच्या दरम्यान ग्रामीण रुग्णालया जवळ गंगा बार समोर एका अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळून आला आहे. शेजारच्या लोकांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करून पोलीसांना माहिती दिली. पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली असून मृत्यूदेहाची ओळख वृत्तलिहे पर्यंत पटली नसून सदर तरुण ३२ते३५ वयोगटातील असुन अंगात पिवळ्या रंगाचे टि शर्ट, काळ्या रंगाच्या बरमोड्यावर, पांढऱ्या रंगाचे ठिपके असलेला बरमोडा घातला असून, उजव्या हातात पांढऱ्या धातुचे कडे व बोटात अंगठी घातली आहे.
कुणालाही ओळख पटली असल्यास, ग्रामीण रुग्णालय वणी किंवा पोलीस स्टेशन वणी येथे संपर्क करावा.