
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
शांततेच्या वातावरणात आज २५ मे रोजी पार पडलेल्या तालुक्यातील खैरी येथील सोसायटीच्या निवडणुकीत रविंद्र निवल यांच्या गटाने बहुमताने विजय संपादन केला. निवल गटाच्या १३ उमेदवारांपैकी १३ ही उमेदवार भरगच्च मतांनी आले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून खैरी सोसायटी वर असलेले प्रफुल्ल मानकर यांच्या निवल गटाचे वर्चस्व याही निवडणुकीत कायम राहीले आहेत. या निवडणुकीत प्रफुल्ल मानकर गटाचे रविंद्र निवल यांनी दिलेली पाच उमेदवार, वसंतराव , पुरके यांच्या गटाचे सुनिल गवारकर तसेच आनंदराव बोंदरे यांनी दिलेली चार उमेदवार तर भाजपाचे चार उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. तर विरोधात माजी सरपंच रविंद्र खैरकार, उत्तमराव फुटाणे, शिवसेनेचे डॉ संजय पवार यांनी त्यांच्या गटाचे तेरा उमेदवार रिंगणात उतरवले होते. विजयी उमेदवारांमध्ये विलास नथ्थूजी चिडे, अशोक शामराव वनकर, कुसुम वसंतराव जवादे, सपना सचिन तंगडपल्लीवार,विशाल बबनराव पंढरपुरे, रमेश भाऊराव आसुटकर, कचरुलाल हिरालाल झामड, प्रमोद मनोहर डफरे, रविंद्र किसनराव निवल, कैलास गंगाधर पंढरपुरे, गुरुदेव आनंदराव बोंदरे, गणेश सुभाष रायमल व अरुण शंकर सरोदे यांचा समावेश आहे. रविंद्र निवल यांचे सोसायटी वर गेल्या अनेक वर्षांपासून असलेले वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी विरोधी गटाने अटोकाट प्रयत्नांसह मोठी मेहनत घेतली होती. मात्र विरोधी गटाचे प्रयत्न व दिवसरात्र घेतलेली मेहनत मतदारांनी फोल ठरविली.
