
प्रतिनिधी. चैतन्य कोहळे
भद्रावती शहर परिसरातील अनुसूचित जातीतील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीस दि. २४ मे रोजी न्यायमूर्ती डी. के. भेंडे जिल्हा सत्र न्यायधीश न्यायालय वरोरा यांनी तीन वर्ष कारावासाची शिक्षा व ३००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
घटना तारीख वेळी व ठिकाणी फिर्यादीचे अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचे तोंडी तक्रारीवरून सन 2017 मध्ये कलाम 363,366(3) (2),(5)भा.द.वि.7,8,9(एम)(व्ही) 12 पोस्को कायदा,3 अनुसुचित जाती ,अनुसूचित जमाती प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा तपासात घेतल्यावर तपास अधिकारी प्रताप डी. पवार पोलिस उपविभागीय अधिकारी, वरोरा यांनी आरोपी निष्पन्न करून पुराव्यानिशी न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते.त्यानुसार न्यायालयाचे सुनावणी दरम्यान साक्षीदार तपासले व योग्य पुराव्याचे आधारे दि.25 मे रोजी न्यायालयाने आरोपीला 3 वर्षाची सश्रम कारावासाची सजा व 3 हजार रुपये दंड,दंड न भरल्यास 3 महिने साधा कारावास न्यायमूर्ती डी. के.भेंडे सत्र न्यायाधीश वरोरा यांनी सुनावणीचे वेळी सजा ठोठावली. सदर प्रकरणात सरकारी वकील ऍड. मिलिंद देशपांडे कोर्ट पैरवी पो.ना.इंदिरा शास्त्रकार वरोरा यांनी काम पाहिले.
