रोडची साईड पट्टि भरण्यासाठी मुरमाऐवजी दगडाचा वापर,यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत भोंगळ कारभार

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यात संध्या जिल्हा परिषद अंतर्गत डांबरी रोडचे मोठ्या प्रमाणात गाजावाजा करत रोडचे कामे चालू आहे. ठेकेदार डांबरीकरण सुरू असताना जिल्हा परिषद चा एकही कर्मचारी उपस्थित न राहता हे कामे चालू असताना दिसतात अशातच राळेगाव तालुक्यातील सावनेर आंजी या डांबरी रोडचे दोन किलो मिटरचे काम एका कंपनीने घेतले असून या कामामध्ये खडीकरण चालू असताना गावातील नागरिकांनी कामामध्ये डांबर कमी वापरत असताना तेथील कंपनीच्या एका व्यक्तीला सांगितले असता त्या गोष्टिकडे लक्ष दिले नाही सावनेर येथून आंजी येथे पावसाळ्यात जात असताना या रोडवर व रोडच्या बाजुने मोठ मोठे खड्डे पडले होते चालतांना किंवा वाहन नेतांना मोठा त्रास होत होता अशातच या रोडच टेंडर निघाले व या रोडचे काम पूर्ण करन्यात आले पण सावनेर या गावांमध्ये रोडची साईड पट्टि भरण्यासाठी चक्क गावकरी यांची दिशाभूल करून माती मिश्रीत मुरुम टाकण्यात आला हि माहिती गावकरी यांनी जिल्हा परिषद चे इंजिनिअर शिंगने यांना मोबाईल वरून कळविण्यात आले पण शिंगने यांनी मुरमाऐवजी आम्ही तुमच्या गावात आता साईड पट्टि भरण्यासाठी गोटा पाटवतो असे छंमकछलो उत्तर दिंले आणि त्या कंपनीने जिल्हा परिषद इंजिनिअर शिंगने यांच्या सांगण्यावरून मुरमाऐवजी दगड गोटा टाकण्यात आला हा दगड गोटा एवढा मोठा आहे यांच्यावरून बैलगाडी, मोटरसायकल यांचा अपघात झाल्याशिवाय राहनार या गोष्टिला जबाबदार कोन राहनार या रोडची व मुरमाची जिल्हा धिकारी तसेच जिल्हा परिषद चे सिओ यांनी लक्ष देऊन दगडा ऐवजी मुरूम भरन्याचे संबंधित कंपनीला कळवावे.