अशोकराव काचोळे यांचा वाढदिवस खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात केक कापून साजरा

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव येथील खरेदी विक्री संघाचे संचालक श्री अशोकराव काचोळे यांचा वाढदिवस आज दिनांक 2/6/2022 रोजी खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात केक कापून व शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन साजरा करण्यात आला.त्यावेळी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष श्री मिलिंदभाऊ इंगोले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री दिपकराव देशमुख, बाजार समितीचे संचालक तथा रावेरीचे सरपंच श्री राजूभाऊ तेलंगे, खरेदी विक्री संघाचे संचालक श्री अंकुश भाऊ मुनेश्वर, खरेदी विक्री संघाचे संचालक श्री श्रावनसिंग वडते सर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री राजेन्द्र ओंकार,श्री गोविंदराव चहांदकर, ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था राळेगावचे नवनिर्वाचित संचालक श्री गजानन पाल,श्री नितीन महाजन, वनोजा सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक श्री चंदूभाऊ उगेमुगे, श्री गजानन झाडे तसेच खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक श्री संजय जुमडे, कर्मचारी गणेश हिवरकर,किरण गाडगे, अवधूत शेराम,रोशन शिवरकर उपस्थित होते.