
पाचगांव (ठा.) –
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्न, महारोगी सेवा समिती द्वारा संचालित, आनंद निकेतन कृषी महाविद्यालय, आनंदवन, वरोरा येथील कृषी शिक्षण घेत असलेले विद्यार्थी ग्रामीण कृषी कार्यानुभव या कार्यक्रमा अंतर्गत पाचगांव येथील शेतकऱ्यांना कृषी विषयक मोलाचे मार्गदर्शन करत आहेत.
शेतकर्यांना आधुनिक बियाण्यांचे ज्ञान, बियाणांविषय जागृक्ता, बियाणांबाबतीत होणारी फसवणूक, इत्यादी विषयक जागृक्ता निर्माण करण्यात कृषीयोद्धाची मोलाची कामगिरी दिसून येत आहे.
प्रस्तुत बियाण्यांविषयक जागृक्ता व कृषी विषयक मार्गदर्शक तत्त्वे हे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पोद्दार, डॉ. रामचंद्र महाजन (प्रमुख ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम) , डॉ. स्वप्निल पंचाभाई, (समन्वयक ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम) तसेच बीज विज्ञान व बीज तंत्रज्ञान क्षेत्रात पारंगत असलेले डॉ. प्रदीप अकोटकर व डॉ. अश्विनी मानकर यांच्या दिशानिर्देशाखाली पार पडत आहे.
या जागृक्ता उपक्रमात वरप्रसाद जैन, शुभम जायभाये, मनिष गुंडावर, रोशन खांडरे, विष्णु काकडे व वैभव जाधव या कृषीयोद्धानी मोलाचा सहभाग दर्शवला.
