
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
घरावर वीज पडून विद्युत उपकरणे निकामी झाल्याची घटना कळंब तालुक्यातील कोठा (वेणी) येथे रविवारी रात्रीदरम्यान घडली. यात घरालाही मोठ्या प्रमाणात तडा गेल्या. गजानन राव धनुस्कर असे नुकसानग्रस्त घरमालकाचे नाव आहे.
रविवारी रात्री तालुक्यात वादळीवाऱ्याचा चांगलाच तडाखा बसला. रात्री ७ वाजतादरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. यावेळी कळंब तालुक्यातील कोठा (वेणी) येथील ग्रामस्थ गजानन राव धनुस्कर यांच्या घरावर वीज कोसळली. यात सुदैवाने कुठलीही जीवितहाणी झाली नसली तरी घरातील विद्युत उपकरणे निकामी झाले. यात घराच्या भिंतीला तडा गेल्या. तसेच सिलिंग फॅन, टिव्ही, इलेक्ट्रिक बोर्ड अन्य विद्युत उपकरणे वीज पडल्याने निकामी झाले. या घटनेची माहिती आ. डॉ. अशोक उईके यांना मिळताच त्यांनी सोमवारी धनुस्कर यांच्या घरी भेट दिली. नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत कैलास बोंद्रे, दीनेश वानखेडे, पवन कदम, संजय दरणे आदी उपस्थित होते.
