
चंद्रपूर : सर्वत्र सुरू असलेले सात दिवसापासून भरपूर प्रमाणात पाऊस पडत आहे त्यामुळे अनेक लोकांचे शेतीचे जानमालाचे नुकसान झाले आहे परंतु भटाडी गावाच्या पुलिया चे अजून पर्यंत काम झाले नाही 2018 19 मध्ये गावकऱ्यांनी आंदोलन केले उपोषण केले त्यावेळी तत्कालीन मंत्री माननीय मुनगंटीवार साहेब यांनी 9 करोडचा भटाडी तिरवंजा कवटी पायली या गावाला पोहोचणारा पुलाला मान्यता दिली तरीसुद्धा ठेकेदाराच्या मनमानी कारभार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे 2019 पासून 2022 पर्यंत खूप कमी काम झाले त्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घेऊन पुलिया पार करा लागत आहे त्यामुळे नागरिक रोशांत आहे चार वर्षे लोटूनही काम थंड बसतात आहे त्यासंदर्भात भटाडी ग्रामपंचायत व सामाजिक कार्यकर्ते सचिन उपरे यांनी वेळोवेळी निवेदन दिले तरीसुद्धा त्यांनी कामाला खूप पावसाळ्याच्या एका महिन्याच्या आधी कामाला सुरुवात केली काम पूर्ण झालं नाहीये त्यामुळे गावकऱ्यांचा रोज वाढत आहे सततचा पाऊस इरई धरणाचे सातही दरवाजे खोलल्यामुळे भटाडी गावातील व आसपास यातील गावातील जनजीवन विस्कळत झालेला आहे पुण्याचा काम लवकरात लवकर करून भटाडी गावाच्या समस्या कडे लक्ष द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन उपरे व गावकऱ्यांनी केली आहे तसेच न झाल्यास आम्ही आंदोलनाचा पर्याय घेऊ या सर्व शासन प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील. यामधे लोकचे शहरापासून संपर्क तुटला आहे अशात जर कुणाला काही झालं तर याची जबाबदारी कोण घेणार पाहण्याची गोष्ट आहे आता यावर सार्वजनिक बांधकाम विभाग काय पाऊल उचलते हे पाहण्याजोगता आहे.
