जिल्हास्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

:-समुद्रपूर येथील उज्वला कावडकर प्रथम तर आष्टी येथील भाविका भिसे दृतीय.

वर्धा:-वर्धा जिल्ह्यातील सर्व महिलांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.जनकल्याण फाउंडेशन तर्फे जनकल्याण फाउंडेशन चे प्रदेश अध्यक्ष तथा युवा सामाजिक कार्यकर्ते पियुष रेवतकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निबंध स्पर्धा घेण्यात आली होती.पर्यावरणा बाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.एक कृती माझी पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने या विषयावर ही निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.20 वर्षावरील सर्व भगिनी साठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या जिल्हास्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धेत वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथील उज्वला कावडकर

प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या , दृतीय क्रमांक आष्टी येथील भाविका भिसे यांनी पटकावला तर तृतीय क्रमांक वर्धा येथील योगिता लाखे यांनी प्राप्त केला. या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस 3000 हजार ,दृतीय 2000 हजार तर तृतीय बक्षीस 1000 हजार असे होते.दिनांक 28 जुलै ला जनकल्याण फाउंडेशन चे प्रदेश अध्यक्ष पियुष रेवतकर यांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात येईल.