
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील अकरावीत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना काल दुपारी बारा वाजता घडली. कॉलेज सुटल्यानंतर आपल्या गावी परत जात असताना गावाकडे जाणाऱ्या आरोपी राजू नानाजी पांडे वय 41 याला मुलीने मोटरसायकलवर लिफ्ट मागितली पीडित अल्पवयीन मुलीला गावाकडे न नेता दुसऱ्याच मार्गावर मोटरसायकल पळवली आपली फसवणूक होत आहे. हे लक्षात येताच मुलीने आरडा ओरड केली व आरोपीच्या जाळ्यातून सुटका करून घेतली. आणि पायदळ आपले घर गाठले घरी परत आल्यानंतर आपल्या आईला घटना कथन केली. व मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी राजू पांडे यांचेवर भादवी 354 व ५०६ नुसार गुन्हा नोंदविला असून आरोपीला अटक केली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक संजय चोबे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील अधीक तपास करीत आहे.
