स्व. नंदूभाऊ सुर बहुद्देशीय सामाजिक संस्था माजरी तर्फे रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी

माजरी प्रतिनिधी दि.२८.७.२०२२

माजरी- स्व. नंदूभाऊ सुर बहुद्देशीय सामाजिक संस्था माजरीच्या वतीने स्व. नंदूभाऊ सुर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने गुरुवारी मातारानी मंगल कार्यालय माजरी वस्ती , पाटाळा येथे रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात माजी जि.प.सदस्य प्रवीण सुर यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांची तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत डोळ्यांचे आजार , मोतीयाबिंदु शस्त्रक्रिया तिरळेपणा इत्यादी सर्जरी तज्ञ : – हायड्रोसिल हर्निया , अंगावरील गाठी , आतडयाचे आजार मुतखड्याचे आजार , पोटाचे आजार , गलगंड ( थॉयराईड ) इ . स्त्रीरोग तज्ञ : – मासिक पाळीचे आजार , पांढरे पाणी जाणे , महिलांचे आजार , गाठी अस्तीरोग तज्ञ : – संधिवात , मनक्यात असणारी गॅप , वाकलेले पाय , फ्रॅक्चर तसेच हाडांचे सर्व आजार त्वचारोग तज्ञः- खाज , गजकरण , अंगावरील पांढरे डाग , त्वचेचे विविध आजार – बालरोग तज्ञ : – हृदयाला छिद्र असणे , मतीमंद मुलांच्या विकासा संबधी आजार तसेच कुपोषण , लहान मुलांचे सर्व आजार नाक कान घसा तज्ञ : – ऐकु न येणे , कानातुन पांढरे पाणि वाहने , ट्रॉन्सील , कान नाक घस्यांचे सर्व आजार इ . श्वसन रोग तज्ञ : – दमा , बरेच दिवसापासुन खोकला , तोंडावाटे पडणारे रक्ताचे ठसे अश्याप्रकारे अनेक आजारांवर मोफत तपासणी करण्यात आली.
याप्रसंगी माजरी परिसरातील नागरिकांनी या श्रध्दांजली कार्यक्रमास उपस्थित राहून स्व. नंदूभाऊ सुर यांना श्रद्धांजली वाहिली.
रक्तदान श्रेष्ठ दान आहे. गरजूंना आवश्यक त्यावेळी रक्त उपलब्ध होत नाही. अशावेळी त्यांची धावपळ होते. प्रसंगी रुग्णाला जीवही गमवावा लागतो. ही वेळ येऊ नये यासाठी रक्ताचा साठा आवश्यक आहे. यादृष्टीने सदर रक्तदान शिबिर घेण्यात आले आहे. स्वर्गीय नंदूभाऊ सुर बहुद्देश्यीय सामाजिक संस्था व  लाइफ लाइन रक्तपेढी नागपुर, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे  यांच्या संयुक्त विद्यमाने माजरी वस्ती व पाटाळा येथे गुरुवारी (दि. २८) रक्तदान शिबीर व मोफत आरोग्य तपासणी करण्यात आला .दरम्यान या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. शिविरात ७३० रुग्णाची विविध आजारावर तपासणी करण्यात आला. दरम्यान नागपुर येथील लाइफ लाइन रक्तपेढी विभागाचे या शिबिरासाठी विशेष सहकार्य लाभले आहे.
या शिबिरात ३५ रक्तदात्यानी रक्तदान केले आहे.
याप्रसंगी प्रवीण सुर यांनी सामाजिक दायित्व जपत रक्तदान करून मानवतावादी कार्य करणाऱ्या रक्तदात्यांचे कौतुक केले.
परिसरातील रुग्णाना शिबीर स्थळी येणे-जाणे करण्याकरिता आयोजकांनी वाहनांची व्यवस्था केली होती.कार्यक्रमात नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याबद्दल जि. प. सदस्य प्रवीण सूर यांनी यावेळी नागरिकांचे आभार व्यक्त केले.
यावेळी यूथ ग्रुप माजरीचे कार्यकर्ते यांच्यासह माजरी परिसरातील अनेक
नागरिकांची उपस्थिती होती.