ओबीसी समाजाने तहसिल कार्यालयासमोर केले आंदोलन

प्रतिनिधी:चैतन्य कोहळे,भद्रावती
लोकहीत महाराष्ट्र भद्रावती ग्रुप ला जॉईन करा
https://chat.whatsapp.com/Hs2UOvTQpYaLeh2RPUj5b2
ओबीसींची जातनिहाय जनगणना करा, ओबीसींचे राजकीय व इतर क्षेत्रातील व जिल्ह्यातील आरक्षण पुर्ववत करा, अन्यथा सत्ता सोडा, ओबीसींची जातनिहाय जनगणना जो करेल ओबीसी समाज त्याच्या सोबत, ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवा, नवे पर्व ओबीसी सर्व असा एल्गार करीत ओबीसी समाजाने जिल्हाभर तहसिल व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज (दि.२४) ला डॉ. अशोक जिवतोडे यांच्या मार्गदर्शनात निदर्शने केली.
ओबीसी समाजाची २०२१ मधे होऊ घातलेली जातनिहाय जनगणना केंद्र सरकार करत नसेल तर महाराष्ट्र शासनाने राज्यात ओबीसींची जातनिहाय जनगणना करुन ओबीसी समाजास न्याय मिळवून द्यावा, दिनांक 4 मार्च 2021 चा सुप्रीम कोर्टाच्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने पुर्ववत करण्याकरीता समर्पित आयोगाची नियुक्ती करुन इम्पेरीकल डाटा गोळा करुन संकलित माहिती सर्वोच्च न्यायालयात सादर करुन ओबीसींचे राजकीय आरक्षण लवकरात लवकर लागु करावे, २४३ डी व २४३ टी या घटनात्मक कलमान्वये घटनादुरुस्ती करुन ओबीसींचे राजकीय आरक्षण २७% निश्चीत करा, मराठा समाजाचा ओबीसी संवर्गात समावेश करण्यात येवू नये, क्रिमीलेयरची मर्यादा मागील चार वर्षांपासून न वाढल्याने ती वाढवा, ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नती मध्ये आरक्षण दया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नंदुरबार, धुळे, ठाणे, नाशिक, रायगड व पालघर अशा आठ जिल्ह्यातील कमी झालेले आरक्षण पुर्ववत करा, ऑल इंडिया मेडिकल कोटा मध्ये ओबीसींच्या कमी झालेल्या जागा पुर्ववत करा, ओबीसींचा बॅकलॉक त्वरित भरा, आधी जातनिहाय जनगणना करा व मगच रोहिणी आयोग लागु करा, व राज्यसरकारने मेगा नोकर भरती त्वरीत करावी, राज्य शासनाने एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षा त्वरीत घ्याव्या, आदी अनेक मागण्यांवर आंदोलन करुन केंद्र व राज्य सरकारांना निवेदन देण्यात आले.
यावेळी आंदोलनात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे दि. चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सह. बँकचे माजी अध्यक्ष तथा विदयमान संचालक रविंद्र शिंदे, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, प्रशांत काळे, नितेश खरवडे, उमेश काकडे, पुरुषोत्तम मत्ते, सुनिल आवारी, आदम सौदागर, अजय विधाते, सौ. ज्योती मोरे, आशीष ठेंगणे, कवडू मत्ते, स्वप्निल मोहीतकर, अतुल कोल्हे, राजु डोंगे, उमेश कांबळे, विकास डुकरे, राकेश खुसपुरे, राहुल झाडे, जितू पारखी, चैतन्य कोहळे,संदीप गोखरे, अमोल नागपुरे, देवेंद्र नागपुरे, गोपाल सातपुते, राजेश ताजणे, व मोठ्या संख्येने राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, ओबीसी च्या सर्व संघटना, ओबीसीत मोडणाऱ्या सर्व जात संघटना सहभागी होत्या.
