लिंक फेल झाल्याने बैंक ग्राहकाना फटका

माजरी प्रतिनिधी:चैतन्य कोहळे, भद्रावती

माजरी- येथील सीडीसीसी बँकेची लिंक फेल असल्याने बुधवारपासून या बँकेचे व्यवहार ठप्प आहे. ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना परत जावे लागले. ग्रामीण भागातील अनेक शेतकरी, वयोवृद्ध नागरिकांचे या बँकेत खाते आहेत. श्रावणबाळ वृद्धापकाळ योजनेचे पैसे बँकेत जमा होतात. नागरिकांनी पैसे काढण्यासाठी गर्दी केली होती. मात्र बुधवारी सकाळपासूनच लिंक फेल होती. त्यामुळे आर्थिक व्यवहार ठप्प पडले होते. परिसरातील कोंढा, चालबर्डी, माजरी, पळसगाव, नागलोन, विस्लोन, कुचना आदी गावातून नागरिक बैंकेत येतात. व्यवहार ठप्प पडल्याने बँके कर्मचाऱ्यांनी दरवाजा बंद केला. त्यामुळे अनेक नागरिकांना बँकेच्या बाहेर थांबून प्रतीक्षा करावी लागली. याबाबत अनेकांनी संताप व्यक्त केला. याबाबत बैंक व्यवस्थापकांशी संपर्क केला असता, काही तांत्रिक अडचणीमुळे लिंक फेल आहे. मात्र अतिआवश्यक असलेल्या ग्राहकांना हेडऑफिसच्या मदतीने पेमेंट देण्यात आला. तांत्रिक अडचणी लवकरच दूर करून बैंक ग्राहकांना पूर्ववत सेवा देण्यात येईल अशी माहिती शाखा व्यवस्थापक राजू मोहितकर यांनी दिली.