
प्रतिनिधी: प्रवीण जोशी,ढानकी
गेल्या दोन आठवडयापासून अतिवृष्टीच्या पावसाने नागरीकांसह शेतकऱ्याच्या पिकाची मोठी हानी झाली. अतिवृष्टी झालेल्या पुराच्या पाण्याने नदी नाले ओसंडून वाहत पुराचे पाणी पुलावरून वाहले.त्यात अनेक गावांचा दिवस दिवस संपर्क तुटला काही गावांना तर पुराच्या पाण्याने वेढाही दिला.ढाणकी बिटरगाव रस्त्यावरील अनेक पुले पावसाच्या पाण्यात खचली.अशा स्थितीत अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडलेल्या पुरग्रस्त भागाला नव्यानेच रूजू झालेले अमरावती विभागाचे आयुक्त डाॅ.दिलीप पांढरपट्टे यांनी 30 जुलै 2022 रोजी सायंकाळी 4 वाजता भेट देऊन पुरपरिस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी त्यांच्या सेाबत यवतमाळ जिल्हयाचे जिल्हाधीकारी अमोल येडगे,उमरखेड उपविभागाचे उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड,उमरखेडचे तहसीलदार आनंद देवूळगावकर,उमरखेड पं.स.चे गटविकास अधिकारी प्रविण कुमार वानखेडे ,ढाणकी मंडळाचे मंडळाधिकरी सचिन फटाले,पटवारी डोंगरे,पटवारी शिवणकर साहेब,व ढाणकी बिटरगाव मंडळाचे कृशी सहायक हजर होते.
11 ते 13 जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टी त ढाणकी बिटरगाव रस्त्यावरून वाहणा ऱ्या या आट्रीच्या नाल्याच्या महापूराने नाल्या काठावरील शेतकरी यांच्या जमीनी मोठया प्रमाणात खरडून गेल्या जमीनीच्या सखल भागात पुराचे पाणी साचल्यामुळे पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते.अतिवृष्टीच्या पावसाने शेतकऱ्याचे होते नव्हते ते हिरावून घेतले होते.या अस्मानी संकटाच्या ओझेने शेतकरी पूर्णता हातबल झाला होतो.अशा या भयावह परीस्थितीचा आढावा घेण्यासाठी यवतमाळचे जिल्हाधीकारी अमोल येडगे यांनी 13 जुलैला आट्रीच्या पूलाची पाहणी करून नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेतल्या आणि उमरखेड तहसील चे तहसीलदार आनंद देवूळगावकर यांना सूचना देवून नुकसान ग्रस्त शेतकऱ्याच्या बांधावर जावून पिक नूकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले मात्र महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही ठिकाणचे अजूनही पंचनामे केले नाही.त्यामुळे शेतकऱ्यांनी आयुक्तापूढे नाराजी व्यक्त केली.तसेच दरवर्शी नाल्या काठच्या शेतकऱ्यांना पूराचा आर्थीक फटका सहन करावा लागतो.या नाल्याचे रूंदीकरण व पुलाचे उंचीकरण वाढविल्यास शेतकऱ्यावर अशी नौबत येत नाही.असे सांगून पुलाच्या उंचीची मागणी लावून धरली.तसेच बिटरगाव जवळील नाल्यावर असलेला पूल अतिवृष्टी व पुराच्या पाण्याने खचल्यामुळे नागरींना या पूलावरून येजा करणे जिकरीचे झाले आहे.या पुलाचे तात्काळ डागडूगी करावी.ढाणकी बीटरगाव हा रस्ता चाळणी झाल्याने प्रवाषांना वाहन चालवितांना कराव्या लागणाऱ्या कसरतीचा पाढाही वाचावा लागला.
