

चंद्रपुर : एक तरुण मुलगी दुसऱ्या तरुण मुलीचे केस पकडून बाचाबाची करत असताना अचानक चार मुलीचा एकत्र जमा झाल्या आणि त्या मुलीने चक्क लाथाबुक्यांनी फ्री स्टाईल हाणामारी करीत असल्याचा या हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये चार मुली एका मुलीचे केस पकडून मारहाण करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ चंद्रपुर शहरातील आझाद बगीचा येथील असल्याचे समजते. मात्र ही हाणामारी प्रियकरासाठी झाली असा अंदाज या विडिओ तील संभाषणातून कळत आहे. याची सविस्तर माहिती अजून समोर आलेली नाही. मुख्य म्हणजे या मुली अगदी कमी वयाच्या असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात चंद्रपुर पोलिसांत अजून कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
चंद्रपुर शहरात असलेला आझाद बगीचा नव्याने सौंदरीकरण करण्यात आले आहे. बगीचा
सौंदरीकरण करण्यात आल्याने अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी येथे येत असतात, तर काही नागरिक फेरफटका मारण्यासाठी येत असतात. आझाद बगीच्याच्या पार्किंग जवळ एक मुलगी दुसऱ्या मुलीचे केस पकडून काही तरी बोलत होती. त्यानंतर अचानक आणखी तीन मुली तिथे आल्या. त्या चारही मुलींनी तिचे केस पकडून लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करत असताना हा मारहाणीचा व्हिडिओ कुणीतरी मोबाइल मध्ये कैद करून वायरल केला. हा हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
दिवसा ढवळ्या आझाद बगीच्यात मारहाण होत असतांनाही भांडण सोडविण्यात कोणीही गेले नाही. उलट व्हिडिओ काढून वायरल झाला. यासंदर्भात चंद्रपुर पोलिसांत अजून कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.आपली मुलगी बाहेर जाऊन काय करते,कोणासोबत राहते कशी लागते याबाबत प्रत्येक पालकाने जागरूक राहण्याची गरज आहे अन्यथा अशे प्रकार सर्रास घडत जातील.
