
ढाणकी प्रतिनिधी -प्रवीण जोशी
शहरातील वाढती पाणी समस्या लक्षात घेता शिवसेनेचे ढाणकी शहर सोशल मीडिया प्रमुख व सामाजिक कार्यकर्ता गजानन आजेगावकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ढाणकी शहरात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
पावसाळ्यामध्ये सुद्धा शहराला पंधरा ते वीस दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने शहरातील नागरिक संतप्त आहेत. पाण्यासाठी नागरिकांची वणवण होत आहे. शहर तालुका होण्याच्या मार्गावर असताना सुद्धा स्थानिक नगरपंचायत पाणी समस्येवर ठोस उपाययोजना करू शकली नाही यामुळे स्थानिक प्रशासनाचा निषेध करण्यासाठी त्यांनी उपरोधिकपणे ही मागणी मुख्याधिकारी नगरपंचायत ढाणकी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे केली.
निवेदन देतेवेळी अतुल पराते हे उपस्थित होते.
