
पोंभूर्णा तालुका प्रतिनिधी आशिष नैताम:-
सततच्या मुसळधार पावसामुळे शहरातच नाहि तर ग्रामीण भागात देखील डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असुन अशा डासांनमुळे साथीचे आजार पसरन्याची दाट शक्यता असते मलेरीया,हिवताप, डेंग्यु सारखे जीवघेणे आजार पसरुन जीवीतहानी होऊ शकते यासाठी प्राथमीक उपाय योजना करणे गरजेचे असते याचीच जान ठेऊन ग्राम पंचायत बोर्डा बोरकर च्या वतीने गावात नुकतीच डास नाशक धुर फवारणी करन्यात आली त्यामुळे गावातील नागरीकांना दिलासा मिळाला असून डासांचा प्रमाणहि कमी झाल्याचे दिसून येत आहे बोर्डा बोरकर ग्राम पंचायतचे सचिव,सरपंच तथा सर्व सदस्य व कर्मचाऱ्यांचे आभार गावाच्या विकासासाठी,आरोग्या साठी आपण पुढेहि असेच सहकार्य करावे हि अपेक्षा….
