राळेगाव तालुक्यातील वडकी येथील महावितरण कंपनीने विद्युत पुरवठा संदर्भातील तक्रारी त्वरित निकालात काढाव्यात:सुधीरभाऊ जवादे.

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील वडकी विद्युत कार्यालय येथे आज परिसरातील शेतकरी व ग्राहक यांनी सुधीरभाऊ जवादे यांचेसोबत जाऊन अभियंता गिरी यांचेकडे आपल्या तक्रारी दाखल केल्या. अतिवृषटीमुळे चहांद,परसोडा, खडकी या भागातील अनेक विद्युत खांब वाकले आहे व विद्युत तारा तुटल्या आहेत.मधुकर चामाटे यांच्या शेतात विद्युत तारा तुटल्या मुळे डवरणी करणे बंद आहे.
देवधरी येथील पाणीपरवठा त्वरित सुरू करणे ,ही कामे करणे आवश्यक असल्याचे सुधीरभाऊ जवादे यांनी सांगितले.सोबत गंगारामजी आत्राम सरपंच देवधरी, व नागरिक हजर होते.