व्यसनमुक्तीची राखी बांधून रक्षाबंधन दिन केला साजरा!

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य व भारतीय नारी रक्षा संघटना जि.यवतमाळ यांच्या वतीने तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन राळेगाव येथे नशाबंदीची राखी बांधण्याचा कार्यक्रम साजरा करण्यात आला तहसील विभागात व्यसनमुक्तीची राखी तहसीलदार साहेब श्री. रवींद्र कुमार कानडजे, नायब तहसीलदार श्री. दिलीप बदकी, नायक तह. श्री.सतीश काळे, नायब तह श्री.नत्थू बेंडे, तलाठी श्री.सरतापे ,श्री.बाळूभाऊ धुमाळ यांना व्यसनमुक्तीची राखी बांधण्यात आली. तसेच
पोलीस स्टेशन राळेगाव येथे ठाणेदार श्री संजय चौबे ,जमादार आनंद इरपाते, जमादार विलास खडसे ,जमादार सुभाष काळे, गणेश हुलके ,गोपाल वास्टर यांना व्यसनमुक्तीची राखी बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आला. रक्षाबंधना करिता भारतीय नारी रक्षा संघटना तालुका अध्यक्षा सौ.संतोषी वर्मा ,सौ.प्रणालीताई धुमाळ, प्रिया माकोडे ,नशाबंदी मंडळ यवतमाळ जिल्हा संघटक एडव्होकेट सौ. रोशनी वानोडे /कामडी यांनी रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला .त्यासाठी अर्जुन वर्मा ,आकाश खुडसंगे, श्री.बाळू धुमाळ यांनी सहकार्य केले.