न्यू इंग्लिश हायस्कूल मध्ये स्वातंत्र्य दिना निमित्त ध्वजारोहण”

8

 राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

न्यू एज्युकेशन सोसायटी राळेगाव द्वारा संचालित न्यू इंग्लिश हायसकुल व कनिष्ट महाविद्यालय, येथे दिनांक 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिना निमित्त राष्ट्रध्वज संस्थेचे अध्यक्ष बी. के. धर्मे यांचे हस्ते फडकवण्यात आला . त्याच प्रमाणे स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त्य शाळेत विविध उपक्रमा अंतर्गत रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, सायकल रॅली, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या सर्व स्पर्धा मध्ये शाळेतील सर्व विदयार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला तसेच त्यात दर वर्षाच्या परंपरेनुसार शाळेच्या 10 वी,12 वी बोर्ड परीक्षेमध्ये प्रथम येणारे विद्यार्थी, तसेच शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रमात प्रथम येणारे विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.. यावेळी संस्थेच्या सचिव डॉ.अर्चना धर्मे , संस्था सदस्य स्वप्नील धर्मे, प्राचार्य जितेंद्र जवादे,उपप्राचार्य विजय कचरे,पर्यवेक्षक सुरेश कोवे ,तसेच शाळेतील माजी मुख्याध्यापक, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.