मनसे जिल्हा उपाध्यक्ष पदी शंकर वरघट यांची निवड तर तालुकाध्यक्षपदी राहुल गोबाडे,शेतकरी सेनेच्या अध्यक्षपदी संदिप कुटे यांची निवड

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

कोणताही राजकीय वारसा नसतांना स्वकर्तृत्वावर राळेगाव तालुक्यातील जनतेची कामे करीत शंकर वरघट यांनी तालुक्यात एक वेगळी ओळख निर्माण केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची घोडदौड या तालुक्यात लक्षवेधी ठरली. याची दखल जिल्हानेतृत्वाने घेतली मनसे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्षपदी शंकर वरघट यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली
या फेरबदला मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या यवतमाळ जिल्हा उपाध्यक्षपदी शंकर वरघट यांची तरी राळेगाव तालुकाध्यक्ष पदी राहुल गोबाडे यांची ,तर शेतकरी सेनेच्या तालुकाध्यक्ष पदी संदिप कुटे यांची निवड करण्यात आली. राळेगाव तालुक्यात खेडोपाडी मनसेच्या शाखा उघडुन मनसे कार्यकर्त्यांचे जाळे विणून गोरगरिबी जनता,शेतकरी, विद्यार्थी यांच्यासाठी शासन दरबारी आंदोलनाच्या माध्यमातुन लढा देवुन न्याय मिळवुन देणारे आंदोलक नेतृत्व म्हणुन नावलौकिक मिळविलेले मनसे तालुकाध्यक्ष शंकर वरघट यांच्या कार्याची दखल घेवुन हिंदुजननायक,मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने मनसे उपाध्यक्ष राजु उंबरकर यांनी वरघट यांची मनसेच्या राळेगाव व वणी विधानसभा क्षेत्राच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड केली त्याच बरोबर राहुल गोबाडे यांची मनसे राळेगाव तालुकाध्यक्ष पदी तर संदिप कुटे यांची मनसे शेतकरी सेनेच्या तालुकाध्यक्षपदी निवड केली आहे.वरघट यांनी आपल्या निवडीचे श्रेय मनसे उपाध्यक्ष राजु उंबरकर, आनंद एंबडवार, मनसे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार यांना दिले असुन येणाऱ्या काळात राळेगाव विधानसभा क्षेत्रातील राळेगाव, बाभुळगाव,कळंब व वणी विधानसभा क्षेत्रात मनसेचे संघटन वाढविण्यासाठी कार्य करून मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र घडविण्यासाठी कार्य करणार असल्याची प्रतिक्रिया शंकर वरघट यांनी दिली आहे.