ढाणकी येथे महिला मंडळाचा गोकुळाष्टमी चा कार्यक्रम अगदी उत्साहात संपन्न

(प्रतिनिधी प्रवीण जोशी)

दिनांक 20 तारखेला शहरातील ग्रामदैवत असलेल्या हनुमान मंदिरात महिला मंडळींचा सार्वजनिक गोकुळ अष्टमी चा कार्यक्रम पार पडला या वेळी अत्यंत सुंदर आणि मोहक अशी सजावट महिला मंडळींनी केली होती अनेक लहान चिमुकली लहान मुल श्री कृष्णा चा वेश धारण केल्यामुळे
बाल गोपाल आकर्षणाचा केंद्रबिंदू होते तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्याने तीन दिवसात शहरात नंद के आनंद की जय कन्हैया लाल की अशी बालगोपालांची धूम पाहायला मिळाली. मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सण आणि उत्सवावर निर्बंध लावण्यात आले होते. त्यामुळे पारंपारिक पद्धतीने व मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत उत्सव साजरा करण्याची वेळ ओढवली होती. मात्र अनेक महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असल्यामुळे कार्यक्रम अगदी उत्साहात पार पडला तसेच महिलांनी बनविलेला श्रीकृष्णाचा पाळणा हा सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता. यावेळी गीता पटनाचा कार्यक्रम सुद्धा पार पडला.