जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, दहा लाखाचा मुद्देमाल जप्त

वरोरा:—वरोरा येथील बोर्डा चौकात असलेल्या दिपक बार अँड रेस्टॉरंट च्या बाजूला असलेल्या गाळ्यातील अर्जुन ट्रेडर्स येथे दहा नागरिक अवैध रित्या ताशपत्याचा खेळ खेळत असताना विभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांनी धाड टाकीत दहा लाख चोवीस हजार आठशे ऐंशी रुपयांचा मुद्देमालासह अटक करण्यात आली. ही कारवाही 22ऑगस्ट रोजी रात्री पाऊने बाराच्या सुमारास झाली सविस्तर याप्रमाणे आहे की दिपक उर्फ संभाजी महाजन बोर्डा, सुभाष नथुजी आसुटकर बोर्डा, प्रकाश शामराव खोब्रागडे ,देशपांडे लेआउट वरोरा, हेमंत शिवलिंग राजपूत ,द्वारका नगरी वरोरा ,डेविड शंकर बागेसर, मारुती राहूजी गायकवाड,वायगावता. भद्रावती, विशाल अशोक आसूटकर, बोर्डा ,प्रकाश सत्यवान ताजणे, प्रकाश नारायण आवारी,गंफहाडे ले आउट, बावने लेआउट, चेतन शामराव घुगल साई मंगल कार्यालय वरोरा,अशी आरोपींची नावे आहे ,तर चार दुचाकी MH34BC5501,
MH43S4226,
MH34BM6338,
MH34AY2337
व चार चाकी क्र. MH34BR8118 ही वाहने घटनास्थळी जप्त करण्यात आली असा एकूण 10,24,880रु मुद्देमाल जप्त करण्यात आला.