
कुही : – महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण मंत्रालय स्थापित करण्याबाबत प्रहार जनशक्ती पक्ष तालुका .कुही येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे नागपूर उपजिल्हाप्रमुख संजय अतकरी. यांच्या मार्गदर्शनाखाली व कुही तालुक्यातील अपंग यांच्या हक्का करीता तालुक्यातील दीव्यांग बांधवांचे वतीने निवेदन आहे की आमच्या तालुक्यात शेकडो दिव्यांग बांधव असून त्यांचे जीवन मान सुधारणे , त्यांना रोजगाराचे साधन निर्मिती करून देण्यास शासनातर्फे प्रोत्साहन देणे , त्यांना त्यांची शाररिक क्षमता , शैक्षणिक क्षमता पाहून रोजगाराचे , व उद्योग धंदे करण्याचे हेतूने विविध कौशल्य विकास कार्यक्रम राबविणे , त्यांचे साठी स्वतंत्र घरकुल योजना , विविध उद्योगांसाठी अनुदान , कर्जवाटप त्यांचा शाररिक आवशकत्येनुसार साहित्य पुरविणे , त्यांना शिक्षणात , आरोग्य क्षेत्रात , शासकीय कामात होईल मदत होईल अशा उपाययोजना करणे अश्या मोठ्या स्तरावर उपाययोजना करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी , त्यांना सन्मानाची वागणूक मिळावी या करीता पूर्णवेळ यंत्रणा कार्यरत रहावी आज राज्य , केंद्र शासन , समाज कल्याण , जिल्हा परिषद यांचे मार्फत विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात मात्र या विभागात कार्यरत अधिकारी , कर्मचारी यांना इतर ही शासकीय कामे असतात त्यामुळे शासनाच्या या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नाही त्यामुळे या योजनांचा अपेक्षित लाभ राज्यातील दिव्याअंग बांधवांना होत नाही आज राज्यातील दिवयांग बांधवांची संख्या पाहता त्यांचे साठी पूर्णवेळ व समर्पित भावनेने कार्य करणारी स्वतंत्र यंत्रणा असणे ही त्यांचा भविष्याचे दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे आज राज्यात विविध मंत्रालये त्या त्या विभागासाठी स्वतंत्र यंत्रणा म्हणून कार्यरत आहे मात्र राज्यभरात लाखोंच्या संख्येने असलेल्या दीव्यांग बांधवांसाठी मात्र अतिरिक्त जबाबदारी म्हणून समाज कल्याण मंत्रालयाचे अधिनस्त ही जबाबदारी दिलेली आहे त्यांचे कडे असलेल्या इतरही कामांची व्याप्ती पाहता ते यावर यथोचित लक्ष देऊन आता पर्यंत अपेक्षित दिव्यांग विकास गाठू शकले नाहीत ही शोकांतिका आहे दीव्यांग बांधव सुधा राज्यातील देशातील महत्वाचा घटक आहे आणि त्याला ही सन्मानाने जगण्याचा , आपल्या गरजा पूर्ण करण्याचा आणि न्यायाचा पूर्ण हक्क आहे आणि हा त्याचा अधिकार आहे आज शासनाने राज्यातील ग्राम पंचायत , नगर परिषद , नगर पंचायत , महानगर पालिका यांचे वार्षिक उत्पन्नातून 5 टक्के अनुदान त्त्या गावातील , शहरातील दीव्यांग बांधवांना वाटप करण्याचे निर्देश आहेत मात्र आजही अनेक नगर परिषद , नगर पंचायत , ग्राम पंचायत , महानगर पालिका याची अमलबजावणी करत नाहीत तेव्हा या करीता सतत दीव्यांग बांधवांना सतत रस्त्यावर उतराव लागत अनेक दींव्यांग बांधवांचा योजना त्यांचा पर्यंत पोहचत नाहीत ज्या पोहचतात त्यामध्ये दलालांचा सुळसुळाट झाला आहे . अनेकदा दीव्यांग बांधवांची फसवणूक केली जाते शासनास लुटण्याचे प्रकार अनेकदा घडताना दिसत आहे दिव्यांग बांधवांसाठी तयार केलेल्या योजना व धोरणांमध्ये त्यांचाच समावेश दिसत नाही , शासन दीव्यांग बांधवांसाठी कोटी रुपये खर्च करते मात्र त्यातील नाममात्र निधी दीव्यांग बांधवा पर्यंत पोहचते बाकी निधीवर दलाल आणि काही अधिकारी दरोडा टाकून शासनास लुटण्याचे प्रकार करत आहेत ही बाब गंभीर आहे राज्यातील दींव्यांग बांधवांना इतर नागरिकांचे बरोबरीने आणण्यासाठी तो कोणावरही ओझ होवू नये त्याला अपमान सहन करावा लागू नये या साठी त्याचे विकासाचे दृष्टीने भरसक प्रयत्न होणे अर्थ संकलपात केलेल्या तरतुदीचा पुरेपूर वापर होणे गरजेचे आहे या साठी स्वतंत्र व पूर्णवेळ यंत्रणा कार्यरत रहावी यासाठी दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र दीव्यांग कल्याण मंत्रालय स्थापित करावे अशी दींव्यांग बांधवांची व त्यांचे पालकांची आग्रही मागणी आहे करीता या मागणीचा गांभीर्याने विचार व्हावा याकरिता निवेदन देण्यात आले या वेळी उपस्थित नागपूर उपजिल्हाप्रमुख संजय अतकरी, कुही तालुका अध्यक्ष लंकेश लुठे, पंकज झुरमुरे,सुरेश भदाडे, रोशन बांते, अजय बांते, आशिष लांजेवार, भैय्या लेंडे,बाळा देवतळे, किशोर झलंके, कवडू लेंडे , रमेश धंजोडे, इत्यादी कार्यकता गण उपस्थित होते
