ढाणकी शहरात सर्जा राजाचा सण बैलपोळा उत्साहात साजरा.


ढाणकी प्रतिनिधी/प्रवीण जोशी

ढाणकी शहरात भारतीय संस्कृती ॠतुनुसार वेगवेगळ्या सणांचे महत्व असून यामध्ये नागपंचमी,राखी पौर्णिमा, गणेश चतुर्थी यासोबतच शेतकरी वर्गात आकर्षण करणारा सण म्हणजे सर्जेराजाचा बैलपोळा आहे.शेतकऱ्यांचा मित्र म्हणून बैलाला शेतकरी राजा
त्यांची पालनपोषण करित अगदी आपल्या मुलांप्रमाणे त्यांची काळजी घेतात.दि.२६ आॕगष्ट २०२२ रोज शुक्रवारी श्रावण कृ.१४ अमावस्या महाराष्ट्रातील काही भागात बैलपोळा म्हणून साजरा केला जातो.बैलांची छान सजावट करुन रंगीबेरंगी झुली अंगावर टाकून गावातून वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. आज त्यांच्यासाठी पुरणपोळीचा नैवेद्य हे महत्त्वाचे असते.परंपरेनुसार आज मानकरी पोलीस पाटलांच्या बैल जोडीचे बजरंगबली मंदीराच्या समोर विवाह करण्यात आला .मानकरी बैल जोडीचे पाच प्रदक्षणा घालुन त्यानंतरच गावातील बैल मंदीराला प्रदक्षणा घातल्यानंतर गावातून मिरवून आणल्यानंतर बैलांचे घरातील माता भंगिनी औक्षवंण करुन पुरण पोळीचा नैवेद्य देतात.म्हणून शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण म्हणजे बैल पोळा आहे.
यावेळी ढाणकी शहरात व आजूबाजूच्या खेड्यात कुटूंबीयासह बैलपोळा सणाला
नागरिक व माता भंगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते एवढा दुष्काळ असला तरी बैलाला सजविण्यासाठी जो साज लागतो त्यात कुठलीही कमतरता शेतकरी बांधवांनी ठेवलेली दिसली नाही ही विशेष बाब म्हणावी लागेल.