सुभाष कारखान्यासमोर आंदोलन जाहीर केलेला भाव देण्याची मागणी ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक

प्रतिनिधी:कृष्णा चौतमाल ,हदगाव


हदगांव – तालुक्यातील हडसनी येथील येथील श्री सुभाष शुगर कारखान्याने जाहीर केलेला भाव हा शेतकऱ्यांच्या हिताचा नसून त्यांनी सुरू केलेला मनमानी कारभार असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हा भाव मान्य नसल्याने शेतकऱ्याच्या वतीने सोमवारी 12 सप्टेंबर सकाळी दहा वाजता ते सुभाष शुगर कारखान्याच्या समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यातात येणार आहे.
या आंदोलनासाठी ऊस उत्पादक शेतकरी हातगाव हिमायतनगर उमरखेड कळमनुरी तालुक्यातून आंदोलनासाठी श्री सुभाष शुगर कारखान्यावर येत असून जर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला प्रति टन 2750 रुपये भाव दिलाया आंदोलनासाठी ऊस उत्पादक शेतकरी हातगाव हिमायतनगर उमरखेड तालुक्यातून आंदोलनासाठी श्री सुभाष शुगर कारखान्यावर येत असून जर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला प्रति टन 2750 रुपये भाव दिला नाही तर कारखान्याला कुलूप लावण्याचा इशारा सुद्धा ऊस उत्पादन शेतकऱ्यांनी दिला आहे व उर्वरित राहिलेली उसाची रक्कम धरसाण दर शेकडा 15 व्याजासह एकर कमी देण्यात यावी कारखान्याने प्रत्यक्ष ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समोरासमोर येऊन चर्चा करण्यात यावी अशा प्रकारच्या मागण्या घेऊन ऊस उत्पादक शेतकरी कारखान्याच्या गेट समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
तरी हादगाव हिमायतनगर उमरखेड कळमनुरी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी या सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन उत्पादक शेतकऱ्याचे प्रतिनिधी गंगाधर पाटील फळीकर यांनी केलेे आहे.
सोमवारी हे आंदोलन करताना एखाद्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारची शारीरिक इजा झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी श्री सुभाष शुगर कारखान्याची राहील असे ही त्यांनी सांगितले.