लाडकी नाल्यातील पुरात वाहून गेलेले प्रेत वडकी ते राळेगाव रोडवर ठेवून लाडकी येथिल शेकडो पुरुष व महिला यांनी केला चक्का जाम

1

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

राळेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ अशोक उईके यांनी फेब्रुवारी महिन्यात लाडकी नाल्यांचे पुल उंची करण्याचे उद्घाटन करुन सुध्दा अजुनपर्यंत काम सुरू केले नाही असे उपस्थित नागरिका कडून बोलल्या जात आहे मागण्या मंजूर होत पर्यंत प्रेत उचलणार नाही नागरिकांच्या मागण्या लाडकी येथिल पुलाचे बांधकाम करुन पुल उंची करणे, मुलांना बसस्टॉप ची वेवस्था करणे तसेच मृतकाच्या नातेवाईकांना तातडीची मदत करणे अशा उपस्थित शेकडो पुरुष व महिला यांच्या मागण्या होत्या

वडकी राळेगाव रोड दोन तास बंद असल्याकारणाने वाहतूक ठप्प

अखेर तहसीलदार डॉ रविंद्र कानडजे, नायब तहसीलदार बदकी, वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनायक जाधव, मंडळ अधिकारी पोटे, मंडळ अधिकारी सानप यांच्या मध्यस्थीने लेखी आश्वासन घेऊन प्रेत उचलले.राळेगाव तालुक्यातील लाडकी येथिल अन्नाजी बाळकृष्ण गुडदे वय ५० वर्षं हे वडकी वरुन लाडकी कडे येत असता १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६च्या दरम्यान लाडकी गावालगत असलेल्या नाल्यावरुन पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली होती.त्यांचा रात्री उशिरापर्यंत शोध घेतला असता ते कुठेही आढळुन आले नव्हते सदर १३ सप्टेंबर रोजी सकाळी लाडकी येथिल नागरिकांनी अन्नाजी बाळकृष्ण गुडदे यांचा शोध घेतला असता ते गावालगत असलेल्या दोन ते तीन वावराच्या अंतरावर एका झाडाला अडकून असल्याचे दिसून आले होते.गावालील संतापलेल्या नागरिकांनी अन्नाजी बाळकृष्ण गुडदे यांचे प्रेत घरी नेण्या अयवजी वडकी ते राळेगाव रोडवर ठेवून शेकडो पुरुष व महिला यांनी रोड वडकी राळेगाव रोड बंद केला होता. सदर रोड बंद करण्याचे कारण म्हणजे लाडकी हे गाव ६०० लोकसंख्याचे असुन लाडकी येथे अनेक समस्या निर्माण आहे कित्येक वर्षांपासून पावसाळ्यात लाडकी गावचा संपर्क तुटतो थोडा जरी पाऊस आला तर या नाल्यावर ये-जा करणे बंद होत असते तर चार महिने मुलांना शिक्षण देण्यासाठी गावालग असलेल्या गावांमध्ये ठेवावी लागत असते या गावालगत असलेल्या नाल्यावरुन कित्येक छोटे मोठे अपघात घडले आहे परंतु जीवितहानी टळली आहे तर याच नाल्यावरून एक बैल, एक दुचाकी वाहुन गेली होती सदर या बाबत प्रशासनाला वेळोवेळी सुचना देऊन सुध्दा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले जात आहे तर परत तीच वेळ आली आहे. सदर वेळीच उपाययोजना केल्या असत्या तर अन्नाजी गुडदे यांना आपला जीव गमवावा लागला नसता. घरातला करताधरता पुरुष निघून गेल्याने गुडदे परिवारावर मोठा दुःखांचा डोंगर कोसळला आहे

  

    प्रतिक्रिया

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत पुलाचे काम मंजूर झालेले आहे व त्या कामाची वर्क ऑर्डर सुध्दा झालेली आहे परंतु मागच्या काळामध्ये काही कारणामुळे विलंब झाला आहे तर आता पावसाळा सुरू झाला आहे पावसाळ्यामध्ये काम करणे शक्य नाही पावसाळ्यात काम सुरू केले असते तर रस्ता बंद झाला असता पावसाळा संपताच काम चालू करण्यात येईल यामध्ये लोक प्रतिनिधीचा काय दोष ? अशी प्रतिक्रिया आमदार डॉ अशोक उईके यांनी दिली