
सहसंपादक ,: रामभाऊ भोयर
शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण हा महत्वाचा टप्पा आहे, शिक्षण क्षेत्रातील बदल, राष्ट्रीय शिक्षण धोरण त्यातील अध्ययन -अध्यापन पद्धती, मूल्यमापन, तंत्रज्ञान यातील बदल या सर्व बाबी नीट समजून घेण्याची गरज आहे .शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षणाचा उद्देश आत्मसात करून पुढील काळात उद्दिष्ट साध्य करायचे आहे असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी राजूभाऊ काकडे यांनी केले. मार्कडेय पब्लिक स्कुल राळेगाव येथे आयोजित प्रशिक्षण उदघाटन सोहळ्याच्या अध्यक्षीय स्थानावरून ते बोलत होते.
शेवटच्या टप्यात 120 प्रशिक्षनार्थी शिक्षकांचा यात सहभाग आहे. उदघाटन सोहळ्याला केंद्र प्रमुख, तज्ञ मार्गदर्शन, अपंग समावेशित शिक्षक,साधन व्यक्ती उपस्थित होते.
पुढे बोलतांना गटशिक्षणाधिकारी राजूभाऊ काकडे यांनी 50 तासांच्या या प्रशिक्षणावर भाष्य केले. विध्यार्थी केंद्रस्थानी मानून कार्य करीत राहा अशी अपेक्षा देखील त्यांनी अध्यक्षीय मनोगतातुन व्यक्त केली.