संततधार पावसाने शेतकरी त्रस्त, पिकांचे नुकसान

प्रवीण जोशी,प्रती /ढाणकी


गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पैनगंगा नदीसह इतर नद्या-नाल्यांना मोठय़ा प्रमाणात पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठची शेती खरडून वाहून गेली. शिवाय, ढाणकी आणि परिसरातील हजारो हेक्टर शेतांमध्ये पाणी साचून राहिल्याने उभ्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. यात सोयाबीन, कापूस, उडीद, मूग …गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पनगंगा नदीसह इतर नद्या-नाल्यांना मोठय़ा प्रमाणात पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठची शेती खरडून वाहून गेली. शिवाय,परिसरातील कृष्णापुर, सावळेश्वर, गांजेगाव व चातारी येथील हजारो हेक्टर शेतांमध्ये पाणी साचून राहिल्याने उभ्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. यात सोयाबीन, कापूस, उडीद, मूग आदी प्रमुख पिकांचा समावेश आहे.
अगोदरच कर्जबारीपणा दुबार-तिबार पेरण्यांमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर अतिवृष्टीचे नवे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. उमरखेड तालुक्यातील पावसाच्या पाण्यामुळे बाधित झालेल्या शेतीचा सव्‍‌र्हे करुन शेतकऱ्यांना योग्य ती मदत शासनाकडून त्वरित मिळावी, अशी मागणी होत आहे. इसापूर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पैनगंगा नदीला पूर आला आहे . याचदरम्यान तालुक्यातील नाले-ओढे यांनाही पूर आला आहे गेल्या २० वर्षांपासून कुणीही न पाहिलेला पूर यावर्षी दिसून आला.पैनगंगा नदीच्या काठावरील अनेक गावात पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मा. मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देतील, तसेच तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करतील अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत. शेतात आजही मोठय़ा प्रमाणात पाणी साचले आहेत. शेतमजुरांना सध्या कामे नसल्याने त्यांच्यावरही उपासमारीची पाळी आली आहे. अजूनही पावसाळा संपायला बराच कालावधी असल्याने शेतकऱ्यांसमोर टांगती तलवारच आहे.

Leave a Reply