रस्त्यात खड्डे कि , खड्यात रस्ते काही सुचेना… गांजेगाव ते ढाणकी रोडची झाली दुर्दैवी अवस्था

प्रतिनिधी :प्रवीण जोशी/ ढाणकी

उमरखेड तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेला गांजेगाव ढाणकी हिमायतनगर या गावातील लोकांना नेहमीच ढाणकी येथे जाणे येणे करावे लागते व हा रस्ता उखडला असून येथे अपघात समीकरण हे नेहमीचेच झाले आहे .
नागरिकांचा नाहक बळी जातो . तरीही प्रशासन दुर्लक्ष करते . गांजेगाव ते ढाणकी रोड या मार्गावरील खड्डे बुजवून रस्त्याचे नूतनीकरण करावे , अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे . शिक्षणासाठी नर्सरी पासून ते कॉलेज पर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी गाडी बस ने जाने येणे करतात. तसेच शेतकरी वर्ग मजूर वर्ग या रस्त्याने मोठ्या प्रमाणात जात असल्याने नेहमी रस्त्या ने वर्दळ असते. प्रवासी वाहने , चारचाकी दुचाकी व इतर वाहनाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना रस्त्यावर असंख्य खड्डे असल्याने जीव मुठीत घेऊन तारेवरची कसरत करावी लागत आहे . रस्ताची अवस्था अशी झाली आहे की, रस्त्यात खड्ये की खड्यात रस्ता असा प्रश्न निर्माण झाला आहे. आपला जीव धोक्यात घालून या रस्त्यावरून जावे लागत आहे . व या मार्गावर मोठमोठे खड्डे पडून डांबर निघून गिट्टी बाहेर आली आहे . या रस्त्यामुळे
दुचाकी व चारचाकी वाहनांना अपघाताचा नेहमीच धोका असतो . या मार्गावर नेहमी छोटे मोठे अपघात होत राहतात . म्हणून बांधकाम विभागाने त्वरीत दखल घेऊन या रस्त्याची दुरुस्ती करून मार्गावरील खड्डे बुजवावेत , अशी मागणी नागरिकांकडून होत आहे .