
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम
पोंभूर्णा:-आज दिनांक ०६/०४/२०२३ रोज गुरुवारला भारतीय जनता पार्टी पोंभुर्णाच्या वतीने भाजपा कार्यालय पोंभुर्णा येथे भाजपा स्थापना दिवस साजरा केला आणि त्या निमित्याने जेष्ठ भाजपा पदाधिकारी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी जेष्ठ भाजपा नेते पांडुरंग पाटील पाल जुनगाव यांचे हस्ते भाजपाचा झेंडा फडकविण्यात आला. जेष्ठ पदाधिकारी आनंदराव सातपुते,भाऊजी पाटील बुरांडे, शालिक रामटेके, बापूजी लोणारे गुरुजी, धर्मराव गेडाम, पांडुरंगजी पाल, बाबुराव उरकुडे, मधुकर सोमणकर,गंगाधर नानगिरीवार, यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी अल्का आत्राम जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी चंद्रपूर, सुलभा पीपरे नागराध्यक्ष, अजित मंगळगिरीवार उपाध्यक्ष, ओमदेव पाल महामंत्री,ऋषी कोटरंगे शहर अध्यक्ष, विनोद देशमुख माजी उपसभापती, अजय मस्के युवा मोर्चा अध्यक्ष, गुरूदास पीपरे महामंत्री,महेश रणदिवे,रोशन ठेंगणे जिल्हा उपाध्यक्ष,मोहन चलाख जिल्हा उपाध्यक्ष,तुळशीराम रोहणकर,वैशाली बोलमवार शहर अध्यक्ष, रजिया कुरेशी जिल्हा सचिव, आकाशी गेडाम, नंदा कोटरंगे, शारदा गुरनुले नगरसेविका, बंडू बुरांडे,प्रभाकर पिंपळशेडे,अविनाश ढोंगे,राकेश गव्हारे, धनराज सातपुते, मंगेश उपरे,नैलेश चिंचोलकर,अशपाक कुरेशी, इकबाल कुरेशी,चंद्रशेखर झगडकर आशिष दाशेट्टीवर,भगवान पाल, धर्मराज मेश्राम,राजू ठाकरे आणि भाजपा कार्यकर्ते उपस्थितीत होते.
