
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
ग्रामीण कृषी कार्यानुभव २०२२-२३ या कार्यक्रमांतर्गत मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी तेजस्विनी इंगोले, शृतम मिश्रा, समीक्षा धाये, गौरव रंगे, दिव्या बर्मे,ओम चंद्रवंशी यांनी शेतकऱ्यांना गांडूळ खताचे फायदे व महत्व पटवून सांगितले .आजच्या व्यवहारी दृष्टिकोनाप्रमाणे सेंद्रिय शेती करणे आवश्यक झाले आहे. सेंद्रिय शेती म्हणजे नैसर्गिक शेती साधनाचा वापर करून केलेली विषमुक्त म्हणजेच रसायनाचा वापर टाळून केलेली शेती. शेती टिकवण्यासाठी सेंद्रिय पद्धतीचा वापर केल्यास रासायनिक खतावर व औषधावर होणारा खर्च बचत होऊ शकतो कारण सेंद्रिय शेतीमध्ये रासायनिक खते व रासायनिक औषधे यांचा उपयोग होत नाही सेंद्रिय शेती करताना विविध सेंद्रिय खते लक्षात घेता व रासायनिक सुपीकता व नैतिक सुपीकतेमुळे बदलीने व टिकवणे अत्यंत अवघड आहे. त्यासाठी फार वेळ सुद्धा लागतो म्हणून सेंद्रिय खताचा अधिकाधिक वापर शेतीत केला पाहिजे. गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतापैकी एक उत्कृष्ट खत आहे. देशातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता शेतकरी बंधूंना अन्नधान्याची पुर्वता करण्यासाठी अधिकाधिक पीक घेणे तसेच त्या जमिनीवर प्रतिहेक्टरी उत्पादन वाढविणे गरजेचे ठरते.
शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला असून तो कर्जबाजारी होत आहे , तसेच दिवसेंदिवस शेती जमिनीचे प्रमाण कमी होत असून अन्नधान्याची गरज मात्र वाढतच चालली आहे.गांडूळ खत वापरामुळे पीक उत्पादनात १० ते १५% वाढ व खत वापरात ४० ते ५० % बचत होऊ शकते अशी मौलीक माहीती देवुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.या उपक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. ए. ठाकरे, उपप्राचार्य मंगेश कडु, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. व्ही. महानुर, विषयतज्ञ प्रा. आर. नागमोटे यांच्या मार्गदर्शन लाभले.
