कृषीदुतांनी पिकांवरील बुरशी नियंत्रणासाठी बोरडॉक्स मिक्स्चर बदल मार्गदर्शन

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला संलग्न मारोतराव वादाफळे कृषि महाविद्यालय यवतमाळ येथील कृषि दुत कु.पायल राऊत, कु.अनुष्का चौधरी, आदित्य यादव,ऋषिकेश रणनवरे,श्रेयस शिरभाते, यांनी ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत जामडोह येथे पिकांवरील बुरशी नियंत्रणासाठी बोरडॉक्स मिक्स्चर चा कसा वापर करावा याबाबत शेतकऱ्यांना योग्य असे मार्गदर्शन केले.
कृषिदुतांनी यावेळी बोर्डॉक्स मिक्चर वापरण्याचे महत्त्व पटवून देताना सांगितले ” प्रा.पी. ए.मिळाड्रेत यांनी १९८२ मध्ये प्रथम मोरचुद आणि चुना यांच्या मिश्रणाचा फ्रान्समध्ये द्राक्षावरील केवडा रोगाच्या नयंत्रणासाठी वापर केला.तेव्हापासून सर्वत्र अनेक पिकावर विशेषत: फळबागावर पडलेल्या बुरशीजन्य रोगावर एक प्रभावी उपाय म्हणून बोर्डेक्स मिश्रणाचा उपयोग केला जात आहे ” हा सर्व उपक्रम जामडोह येथील शेतातील आंब्याच्या पिकावर करण्यात आला. यावेळी मारोतराव वादाफळे कृषि महाविद्यालय यवतमाळ येथील प्राध्यापक डॉ.आर. ए. ठाकरे सर , उपप्राचार्य एम.वी.कडू आणि विषयतज्ञ किशोर ठाकरे यांचे मार्गदर्शन मिळाले.