
पतींचा वाढत्या हस्तक्षेपामुळे गावकरी त्रस्त चं
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
पत्रकाराने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बांधलेल्या शौचालयाचे घाणी व अस्वच्छते संदर्भात आपल्या वृत्तपत्रांतून वृत्त प्रकाशित केले याचा वचपा महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील विहीरी संदर्भातील फाईल वर वाढोणाबाजार येथील महिला सरपंचा ने स्वाक्षरी करण्यास चक्क नकार दिल्या ची लेखी तक्रार जाविद कमाल खाॅ पठाण या पत्रकाराने वरिष्ठ अधिकाऱ्यां कडे केली आहे.
सर्व कागदपत्रे व्यवस्थित असून, वीस फाईलीत पैकी माझ्या च फाईल वर स्वाक्षरी फक्त पतींच्या हस्तक्षेपा मुळे झाली नसल्याचा आरोप तक्रारकर्ते यांचा असून “पतीदेव” चं पदाधिकारी असल्यागत नेहमीच वावरताना निदर्शनास येत आहे व विद्यमान आमदारां चा कट्टर समर्थक असल्याने सचिव सुद्धा पतिदेवा च ऐकतात असा आरोप असून,सर्व ग्रामपंचायत ची कामं घरात बसून च सबंधित करतात असा संतप्त सवाल तक्रार कर्ते यांचा असून,पतिदेवांच्या वाढत्या हस्तक्षेपाने वाढोणाबाजार वासी त्रस्त झाले आहेत.
याची सखोल चौकशी करुन माझ्या विहिरी संदर्भात आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य निर्णय घ्यावा अन्यथा आमरण उपोषणाला बसत असल्याचे जाविद पठाण यांनी सांगितले आहे.
