
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील मौजे जळका येथे दी.२९ सप्टेंबर रोजी कृषी विभागामार्फत राज्य पुरस्कृत, एकात्मिक कापूस उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजने अंतर्गत तालुका कृषी अधिकारी अमोल जोशी,मंडळ कृषी अधिकारी राजु ताकसांडे यांच्या मार्गदर्शनात कापुस पिकाची शेतीशाळा प्रशिक्षण वर्ग प्रगतशील शेतकरी श्री प्रताप जगन आडे यांच्या शेतात घेण्यात आली. यावेळी कृषी सहाय्यक तुषार मेश्राम यांनी कापुस पिकावरील येणा-या
रसशोषक किडी विशेषत: फुलकिडे व्यवस्थापन*
निंबोळी अर्क ५% किंवा फ्लोनिकॅमिड ५० टक्के -८० ग्रॅम किंवा फिप्रोनील ५℅ – ६०० मिली किंवा डायनोटेफ्युरॉन २० टक्के ६० ग्रॅम किंवा स्पिनेटोरम ११.७% – १६० मिली किंवा बुप्रोफेझीन २५% – ४०० मिली यापैकी एका कीटकनाशकाची प्रति एकर याप्रमाणे फवारणी करावी.
गुलाबी बोंडअळी चा प्रादुर्भाव दिसल्यास
कपाशीच्या पिकात नियमित सर्वेक्षण करुन डोमकळ्या दिसून आल्यास त्या तोडून आतील अळीसह नष्ट कराव्यात.
निरिक्षणासाठी गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे प्रति एकरी २ या प्रमाणात लावावेत.
कामगंध सापळ्यामध्ये सलग तीन दिवस ८ ते १० पतंग प्रति सापळा किंवा १ अळी प्रति १० फुले किंवा १० टक्के प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या दिसून आल्यास
१. प्रोफेनोफॉस ५० टक्के ४०० मिली प्रती एकर किंवा
२. इमामेक्टिन बेंझोएट ५ टक्के ८८ ग्रॅम प्रती एकर किंवा
प्रोफेनोफोस ४० टक्के + सायपरमेथ्रीन ४ टक्के (पूर्व मिश्रित कीटकनाशक) ४०० मिली प्रती एकर यापैकी एका रासायनीक कीटकनाशकाची आलटून पालटून फवारणी करावी
तसेच काही ठिकाणी कपाशीमध्ये मोठ्या उघाडी नंतर पाऊस झाल्यास आकस्मिक मर ही विकृती दिसून येत आहे. त्याकरिता
१. अतिरिक्त पाण्याचा लवकरात लवकर निचरा करून
२. वापसा येताच कोळपणी व खुरपणी करावी
३. लवकरात लवकर २०० ग्रॅम युरिया+ १०० ग्रॅम पालाश (पोटॅश) + २५ ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड प्रति १० लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड १५० मिली आळवणी करावी.
किंवा
१ किलो १३:००:४५ + २ ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड + २५० ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड २०० लिटर पाण्यातून मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड १०० मिली आळवणी करावी.
कपाशीतील नैसर्गिक पातेगळीचे व्यवस्थापन करण्यासाठी नॅपथेलिन ॲसीटीक ॲसीड (NAA) २.५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी
लाल्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कपाशीच्या शेतामध्ये २० ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट प्रति १० लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने दोन वेळा फुले लागण्याच्या आणि बोंडे भरण्याच्या अवस्थेतफवारावे.
फवारणी करिता दुषित पाणी न वापरता स्वच्छ पाणी वापरावे कामगऺध पक्षी थाऺबे,पिवळे चिकट सापळे या बाबत माहीती देण्यात आली. बिव्हेरीया बासियाना, व्हर्ट्टीसेलियम लेकएनी, या सारख्या मित्र बुरशीचा वापर करणे अशा प्रकारे जैविक पद्धतीने नियंत्रण करण्याचे मार्गदर्शन केले कापसाची फरदड न घेता हंगाम संपल्या नंतर पऱ्हाट्या पासून कंपोस्ट खत तयार करण्याचे आव्हान केले पोकरा व महाडीबीटी योजने विषयी माहिती दिली तसेच लघु उद्योगांना बळकटी करणासाठी ३५% अनुदान असलेली PMFME योजनेत सहभागी होण्याचे व PM किसान योजनेतील लाभार्थ्यांना ekyc पूर्ण करण्याचे आव्हान उपस्थितांना करण्यात आले. सिझंटा कंपनीचे तालुका समन्वयक संदीप काळे यांनी फवारणी करताना घ्यावयाची काळजी बाबत मार्गदर्शन केले . या वेळी सदर शेतिशाळेला सरपंच शंकर मडावी , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गोविंद चहांदकर यांच्या उपस्थितीत प्रकल्पातील १००हेक्टर क्षेत्रा करिता प्रकल्पातील १०० शेतकऱ्यांना अजाडीरॅक्टिन१०००० पीपीएम, फेरोमन ट्रॅप,लूर, झिंग सल्फेट इत्यादी कृषी निविष्ठांचा वाटप करण्यात आला करण्यात आला यावेळी प्रगतशील शेतकरी प्रताप आडे, विठ्ठल ठोंबरे, मंगाम ,कृषी मित्र पंकज सोणेकर व असंख्य शेतकरी व महीला शेतकरी उपस्थित होते शेतीशाळा संपताच अल्पोपहार देण्यात आला.
