
प्रती/प्रवीण जोशी ,ढाणकी
मागील दोनवर्षापासून कोरोना या महामारीमुळे कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करता आले नाही हनुमान दुर्गोत्सव मंडळ दरवर्षी समाज उपयोगी व प्रबोधनात्मक कार्यक्रम ठेवत असतो यावर्षी सुद्धा सुरेश महाराज पोफाळीकर यांचा रामायणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी पाचव्या दिवसाचे पुष्पगोवताना सुरेश महाराज म्हणाले विस्तवाची चिंगारी जर नियंत्रणात असेल तर वायूच्या सहाय्याने तिचे वनव्यात रूपांतर होण्याची शक्यता असते व यामुळे सर्वत्र हाहाकार होण्याची चिन्ह सुद्धा असतात नदी किनारे जे संरक्षित भिंत अथवा डगरीने सुरक्षित नसतील तर अनेक गावाला तिच्या महापुरात बुडण्याची भीती असते जे भयंकर आहे किंवा बनू शकते त्याला वेळीच नियंत्रणात ठेवले तर अनर्थ टळून जीवन सोयीस्कर होते खडतर तपश्चर्या पश्चात इंद्रियाला संयमाने जिंकून आपल्यात समाविष्ट असणारे षडरुपी विकार मद, माया, मसर ,क्रोध, अहंकार, याचा पराभव करून दया, माया, शांती ,धारण केली व तिच्या माध्यमातून संपूर्ण धारण करण्या जगाला उपदेशित करून ते श्रेष्ठ बनले असे सुरेश महाराज यावेळी म्हणाले.
तसेच सृष्टीत बाह्यकारी संघर्ष हा फक्त स्वार्थ अहंकारापोटी होत असतो यातून मिळणारा विजय हा चिरंतन नसून तो पराजयाच्या लपंडावात असतो आपण सारे संसार रुपी चिखलात जन्माला आलो मात्र त्या चिखलातून कमळाप्रमाणे आकृष्ट करते तसे भगवंताने समान व जनतेला आपणाकडे आकर्षित केले व दाखवून दिले त्यांनी स्वतः दुःख भोगून इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न केला या जगात लोक चार प्रकारातून जगत असतात म्हणजे स्वतःला सुखी करण्यासाठी दुसऱ्याला दुःखात लोटणे दुसऱ्याला सुख देऊ नये स्वतः सुखी बनणे स्वतः दुःखात व दुसऱ्यालाही सुखात तर स्वतः सुखी बनणे लोकांना सुखात पाहणे या पृथ्वीवर त्यांनी स्वतःचे जीवन भगवंत बनवून लोकांना दुर्गुणापासून होणाऱ्या धोक्यातून वाचवले नवरात्रीचा पाचव्या दिवशी पूजाअर्चा केली जाते याच देवीच्या माध्यमातून देवतांनी सूर असूराच्या युद्धात असुरावर विजय प्राप्त केला तो देवासाठी असुरालाही मिळालेल्या वरदानातून असे ठरला होता. ती देवी कुमारिकेच्या हातातून सफल झाला कारण ही देवी म्हणजे आदिशक्ती आदिमायेच्या रूपातून ज्या रूपात अवतरले ती स्वतः परब्रम्ह स्वरूपात असते केवळ आपल्या इच्छेने सृष्टीची रचना पालन व कळ नियंत्रण ठरते असेही सुरेश महाराज यावेळी म्हणाले या कार्यक्रमाला हनुमान मंदिराचा सभागृह अगदी खचाखच भरला होता.
