
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड
हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा बुद्रुक हे गाव पाच हजार लोकसंख्या असलेलं नामांकित गाव आहे.या गावातील सार्वजनिक रस्त्यावर बऱ्याच दिवसांपासून घाण पाणी नाल्या तुंबून,रस्त्यावर सांडपाणी वाहून येतआहे.त्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या लहान मुलेंमुलीं,गावातील नागरिकांना घाण पाण्याच्या दुर्गंधीमुळे नाहक त्रास सहन करावा लागतअसून पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामविकास अधिकारी यांना वारंवार सूचना देऊन ग्रामपंचायतीला निवेदन सादर करून सुद्धा या गंभीर बाबीकडे ग्रामसेवकांचा कानाडोळा व दुर्लक्ष केल्यामुळे ग्राम विकासअधिकारी यांचा नाकर्तेपणा दिसून येतेआहे.या प्रकारामुळे नागरीकांत संताप व्यक्त होतआहे.
ग्रामविकास अधिकारी यांच्या आडमुठ्या धोरणामुळे गावकऱ्यांना घाणीच्या साम्राज्याचा सामना करावा लागतआहे.वारंवार ग्रामविकास अधिकारी जक्किलवाड यांना सूचना निवेदन देऊन देखील गंभीर प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत याचाअर्थ ग्राम विकासअधिकारी यांच्या पाठीशी राजकीय वलय आहे काय?असा संभ्रम नागरिकांत निर्माण होतो आहे.
कारण त्यांच्य नेहमी कानावर टाकुन सुध्दा गावाच्या मुलभूत सुखसुविधा कडे त्यांचे साफ दुर्लक्षआहे.एक प्रकारचा हलगर्जीपणाच म्हणावा लागेल.म्हणून पोटा बुद्रुक हे गाव सुजलाम सुफलाम स्वच्छते पासून कोसोदूर राहतो की काय?असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकात निर्माण झाला आहे.घाणीच्या साम्राज्यामुळे सर्वसामान्यांना होणाऱ्या गंभीर आजारांना सामोरे जावं लागतआहे. गावातील नागरीक बालकिशनआराध्ये यांच्या घरासमोरील रस्त्यावर घाण सांडपाणी येतअसून त्यांना या सांडपाण्याचा भयंकर त्रास होतआहे.
ही बाब पंचायत समिती हिमायतनगर येथील गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करूनही दखल घेतली नाही.तसेच या बाबतीत तक्रारीच निवेदन दिलेआहे.मात्र संबंधित ग्रामविकासअधिकाऱ्यांला जाग आलीच नाही.चालढकलपणा करून आतापर्यंत रस्त्यावर असणाऱ्या घाणीच्या सांडपाण्याची विल्हेवाट काय? ग्रामसेवकांनी लावलीच नाही.त्यामुळे दांडीबहादूर, कामचुकारपणा करण्यात येतआहे. मुख्यालय नराहणाऱ्या ग्रामविकास अधिकार्राबद्दल नागरिकांत रोष व्यक्त होताना दिसतआहे.घाण पाण्याचा प्रश्न ग्रामपंचायतस्तरावर ग्रामपंचायतीच्या आधिनियमाप्रमाणे रस्त्यावर वाहणाऱ्या पाणी नालीत सोडण्याची व्यवस्था करून रस्त्यावर वाहणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावावा असे निवेदन जिल्हाधिकारी नांदेड,मुख्यकार्यकारीअधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना दिनांक २८/०९/२०२२रोजी निवेदन देण्यातआले.पाण्याचा प्रश्नमार्गी लागत नसेल न्याय मिळत नसेल,तर मीअर्जदार बालकिशन आराध्ये लोकशाही पद्धतीने पंचायत समिती हिमायतनगर येथील गट विकास अधिकारी कार्यालयासमोर येणाऱ्या काळात आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
