महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड


हिमायतनगर शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आज भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी व जय जवान जय किसान चे शिल्पकार लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त बैठक आयोजित करण्यात आली होती जिल्हा उपाध्यक्ष पदी नागोराव शिंदे पळसपुरकर तर हिमायतनगर तालुका अध्यक्ष पदी परमेश्वर सुर्यवंशी, तालुका उपाध्यक्ष पदी गंगाधर गायकवाड दिघीकर, सचिव पदी सुनिल चव्हाण सल्लागार म्हणून आनंद जळपते कोषाध्यक्ष विनोद चंदनगे तर संघटक पदी विजय वाठोरे कृष्णा राठोड सहसचीव पदी निवड करण्यात आली काही कार्यकारणी काही पुर्ण होणार आहे या बैठकीला उपस्थित ग्रामीण पत्रकार संघ जिल्हा अध्यक्ष हिमांशू हिगोले जिल्हा सचिव रविकुमार भुसारे तरुण भारत चे प्रतिनिधी मनोज पाटील लोकपत्रचे दिलीप शिंदे संभाजी राजे जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना शिंदे माधव कदम राजु गायकवाड बाबुराव जरगेवाड पांडुरंग मिराशे, पत्रकार प्रशांत राहुलवाड आदि कार्यकर्ते उपस्थित होते