मुख्यमंत्री शिंदे यांचे विचार ऐकण्यासाठी वणी येथून हजारो शिवसैनिक मुंबई ला रवाना

यंदाचा दसरा मेळावा शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही गटाकडून राज्यातून कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. उच्च न्यायालयात ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा करण्याची परवानगी मिळाल्यानंतर आता ठाकरे गटाकडून मेळाव्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे तर दुसरीकडे शिंदे देखील बीकेसी येथील मैदानावर मेळावा घेण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. शिंदेंचा दसरा मेळावाच खऱ्या अर्थाने शिवसेनेचा खरा दसरा मेळावा असून निष्ठावंत शिवसैनिक या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातुन येत आहे. त्याचाच भाग म्हणून वणी विधानसभा क्षेत्रातून हजारोनिष्ठावंत शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी मुंबई ला रवाना झाले आहे. विशेष म्हणजे वणी मारेगाव व झरी तालुक्यातील एवढ्या मोठ्या प्रमाणात पाहिलांद्याच एवढ्या प्रमाणात गेल्याने प्रस्थापितांचे धाबे दणाणलेआहे.