
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या रामतीर्थ घाटावर यंदा चांगली रेती आल्याने रेती तस्करांनी या घाटावर धुमाकूळ घातला आहे. शेकडो ब्रास रेती चा उपसा रोज चालू असून वर्धा व राळेगाव तलाठी, मंडळ अधिकारी करतात तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. उघड्या डोळ्यांनी अक्ख्यागावाला साऱ्या परिसरातील जनतेला अवैध रेती तस्करी दिसते मात्र प्रशासनाचे नाक, कान, डोळे कोणती सोईस्कर झापड बांधून झोपी गेलें कळण्यास मार्ग नाही. रेती तस्करांनी मात्र दसऱ्या पूर्वीच नदीपात्रातील हे सोनं लुटून सिमोल्लोघन केल्याचे निदर्शनास येते.
रामतीर्थ घाटावर दररोज संध्याकाळ पासून रेती तस्करांची मांदियाळी जमा होण्यास सुरुवात होते. ती पहाटे पर्यंत अव्याहत सुरु असते. यात ट्रॅक्टरांची रांग च्या रांग घाटात दिसून येते. रात्र भर या ठिकाणी ट्रॅक्टर ची घरघर सुरु असते. विशेष म्हणजे अनेक रेती तस्कर तर इतके निर्धावले आहे की ते रात्री जमा केलेली रेती नेने जमले नाही तर रस्त्यावर आणून ढिग तयार करतात. दिवसभर मग ही रेती बिनधास्त वाहून नेल्या जाते.
यंदा गेल्या दशकभरातील सर्वात अधिक पूर वर्धा नदीला आल्याचे दिसलें. या मुळे चांगली बारीक रेती घाटात आली. हा घाट तसाही अवैध रेती तस्कराकरीता राखीव कुरण असल्याची प्रतिक्रिया आहे. सद्यस्थितीत शासनाचा महसूल बुडवून अवैध रेती चा हा गोरखधंदा चांगलाच तेजीत आल्याचे दिसते. या परिसरातील जनतेत मात्र या मुळे संतापाची भावना दिसते. विदर्भ मतदार शी बोलतांना एका स्थानिक पदाधिकाऱ्यांने गावकरीच आता याचा बंदोबस्त करतील अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
क्रमांक 1👇
रेती तस्करी मुळे मृत्यूचा सापळा ठरतोय रामतीर्थ घाट
रामतीर्थ घाटात दोन तरुणांचा रेती उपसा केलेल्या खड्यात पडून दुर्देवी मृत्यू झाला. या आधी देखील रेती उपसा करतांना नदी पात्रात अनेक खड्डे करण्यात येतं असल्याने हे खड्डे मृत्यूचे सापळे ठरल्याची उदाहरने समोर आली आहे. सतत च्या रेती उपसाने पडलेले खड्डे पाण्याने भरतात. यात अंदाज येतं नाही या खड्यात पडले की मृत्यू होतो. या गँभीर बाबीची कुणीही दखल घेत नाही हे विशेष
बॉक्स क्रमांक 2)
चांगली रेती, थेट घाटात रस्ता तस्करांना मोकळे कुराण
या वर्षी वर्धा नदीला अनेक पूर गेलें. तीनदा पुलाच्या वरून पाणी होते. या पुराने शेतीचे नुकसान केले मात्र अत्यंत बारीक रेती नदीपात्रात याच पुरामुळे आली, त्या मुळे रेती तस्करांना मात्र अच्छे दिन आले. या सोबतच रामतीर्थ घाटावर जाण्यास सरळ रस्ता आहे. इतर घाटात यंदा मातीच्या रस्त्याने ट्रॅक्टर जाणे सध्या तरी दुरापास्तच आहे. रामतीर्थ मध्ये ही अडचण नाही. चांगली रेती व सरळ रस्ता अर्थात सोने पे सुहागा. अडचण एकच होती हा घाट अगदी राळेगाव वर्धा या वर्दळीच्या रस्त्यावर आहे. लपून इथून रेती नेताच येऊ शकतं नाही. ही अडचण कुणाचे खिसे गरम करून दूर करण्यात आली. याची माहिती समोर येण्याची प्रतीक्षा आहे.
