
सहसंपादक : रामभाऊ भोयर
नागपूर येथील आझाद नगर मधून निघालेला आयशर ट्रक 14 बैल घेऊन आदीलाबाद कडे घेवून जात असल्याची गोपनीय माहिती वडकी पोलिसांना मिळताच वडकी पोलिसांच्या एका पथकाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 देवदरी घाटात या आयशर ट्रक अडवून ट्रकची तपासणी केली असता यामध्ये एकूण 14 नग बैल आढळून आले या सर्व बैलांची मुक्तता करण्यात येऊन त्यांना गोरक्षण मध्ये पुढील व्यवस्थेसाठी पाठविण्यात आले आहे तर यातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली आहे.
यासंदर्भात वडकी पोलिसांनी सांगितले की नागपूर येथील आझाद नगर मधून आयशर क्रमांक एम एच 40 सिटी 1954 क्रमांकाचा ट्रक आज सकाळी साडेआठ वाजता च्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 देवदरी घाट येथून आदीलाबाद कडे जात असताना त्याची माहिती मिळाल्यानंतर वडकी पोलीस स्टेशनचे अंकुश विनोद पातोडे यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन हा ट्रक अडवला आणि संपूर्ण कायदेशीर कागदपत्रे ची मागणी चालकाकडे करण्यात आली मात्र चालक यातील कोणतेही कागदपत्र देऊ शकला नाही त्यामुळे त्याच्याकडे औपचारिक विचारणा करण्यात आली असता त्याने ही जनावर कत्तलीसाठी नेल्या जात असल्याची माहिती दिली या सर्व जनावरांना पंचनामा करून ताब्यात घेण्यात आले आणि त्यांना गोरक्षण मध्ये पाठविण्यात आले.
यातील वाहन चालक मोहम्मद शाफीक अब्दुल सत्तार कुरेशी वय वर्षे 39, आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे पोलिसांनी पंचनामा करून ट्रक ताब्यात घेतला असून एकूण 17 लाख 60 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यातील जनावरांची किंमत दोन लाख 60 हजार रुपये एवढी आहे तर ट्रकची किंमत 15 लाख रुपये असल्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जाधव यांनी सांगितले आहे. सोबत जमदार निलेश वाढई जमदार विलास जाधव आकाश कुडूसे जमदार संदीप मडावी अंकुश पातोडे विनोद नागडगोजे हजर होते
