महाराष्ट्र सर्वात जास्त हदगाव व हिमायतनगर मतदारसंघासाठी अतिवृष्टीची मदत जाहिर,आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्या प्रयत्नांना यश

या
कार्य सम्राट आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रयत्नांनी 42 कोटी 74 लाखाची अनुदान प्राप्त…


हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड…


हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघात मागील काळात सर्वाधिक पाऊस झाल्याने मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे त्यामुळे शासनाने अतिवृष्टी नुसकान भरपाई म्हणून महाराष्ट्रात सर्वात जास्त नुकसानीची मदत मिळावी ह्यासाठी प्रयत्न करणारे कार्यसम्राट आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी मतदार संघासाठी 42 कोटी 74 लाख 7200 रुपये मंजूर त्याचा घनादेश हिमायतनगर येथील मध्यवर्ती बँकेचे मॅनेजर वाडे कर साहेब यांना दिला यावेळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना त्यांनी असे सांगितले की माझ्या मतदार संघातील शेतकरी बांधवास जशी नुकसानीची मदत मिळाली त्याच प्रमाणे पीक विम्याची सुद्धा मदत मिळून देण्यासाठी मी प्रयत्न करेल असे त्यांनी आज दि 4 ऑक्टोंबर रोजी हिमायतनगर येथील पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित केलेल्या बैठकीत सांगितले…
यावेळी हिमायतनगर तहसीलचे तहसीलदार गायकवाड साहेब, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मयूर आंदेलवार ,नायब तहसीलदार विकास राठोड , तामसकर साहेब,सरपंच संघटनेचे अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रफिक शेठ ,गणेश शिंदे,जनार्दन ताडेवाड,शहराध्यक्ष संजय माने ,ज्ञानेश्वर शिंदे,काँग्रेस अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष फेरोज खुरेशी, पंडित ढोणे, बाकी सेठ, योगेश चिल्कावार, संतोष शिंदे सह कृषी विभागाचे अधिकारी, तलाठी ग्रामसेवक व शिक्षक संघटनेचे अधिकारी,पत्रकार बांधव ,सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.