
नितेश ताजणे
वणी :- येथील पंचशील नगर परिसरातील आशियाना हॉल जवळ आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास एका १२ वर्षीय मुलाचे एका अज्ञात इसमाकडून अपहरण करण्याचा प्रयन्त केल्याची जोरदार चर्चा शहरात सुरु असून पोलिसांकडूनही परिसरातील सिसिटीव्ही कॅमेरे तपासल्या जात असल्याची माहिती आहे. दोनही इसम ऍक्टिवा दुचाकी वाहनावरून पसार झाले आहे.
सद्या सर्वत्र लहान मूल पळविणारी टोळी सक्रिय झाल्याचे वृत्त विविध माध्यमातून प्रकाशित होताना दिसून येत आहे. नुकतेच ३,४ दिवसांपूर्वी देखील असाच एका मुलाला पळविण्याचा प्रयन्त फसला होता आज सकाळी आशियाना हॉल जवळ एक मुलगा बाहेर जात असताना एक ऍक्टिवा दुचाकीने एक इसम आला व त्याने मुलाला गाडीवर बसविले व पळवून नेत असल्याचे मुलाच्या लक्षात येताच त्या १२ वर्षीय मुलाने वाहणावरून उडी मारली व तो धावपडत घरी परतला असता राष्ट्याने ये जा करणाऱ्यांच्या वर्दळीमुळे अपहरण करणारा अज्ञात इसम आपल्या वाहनाने पळून गेल्याची माहिती आहे. पोलीस घटनास्थळी पोहचली असून कसून चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.
BबBBबHBN
