
प्रती/प्रवीण जोशी
ढाणकी
रक्तदान शिबिराच्या कार्यातून वैश्विक समाजाची संकल्पना दृढ होत आहे. कार्यक्रमाला आलेले सर्व संयोजक तरुण असून त्यांच्या कार्याचा धडा संपूर्ण महाराष्ट्राने घ्यावा.
रक्तदान हेच जीवनदान हे मूलमंत्र डोळ्यासमोर ठेवून, तसेच रक्तदान संदर्भात शासनाने केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत 8 ऑक्टोंबर रोजी ढाणकी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ असलेल्या गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नांदेड शाखा ढाणकी च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात जवळपास 25 पेक्षा जास्त महिला व पुरुषांनी रक्तदान केले. बँकेच्या वतीने सर्व रक्तदात्यांना पुष्पगुच्छ प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. नांदेड येथील येथील शासकीय रुग्णालय रक्त केंद्रातील कर्मचाऱ्यांनी रक्त संकलन केले यावेळी बँकेचे महिला पुरुष कर्मचारी एजंट व शहरातील रक्तदाते नागरिकांची उपस्थिती होती.नागरिकांनी जास्तीतजास्त रक्तदान करण्यासाठी पुढं येण्याची आवश्यकता आहे. असे शाखा व्यवस्थापक मुकुल पांडे यांनी सांगितले.
